Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | दर महिन्याला एक लाख कमवा, छोट्या गुंतवणुकीतून हा उद्योग सुरु करा

Pune Business Idea News | तुम्हाला कमी गुंतवणुकीतून उद्योग सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी व्यवसायाची चांगली संधी आहे. कमी गुंतवणूक करुन महिन्याला लाखभर रुपये या माध्यमातून मिळवता येतील. काय आहे हा उद्योग पाहूया...

Pune News | दर महिन्याला एक लाख कमवा, छोट्या गुंतवणुकीतून हा उद्योग सुरु करा
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 3:06 PM

पुणे | 24 सप्टेंबर 2023 : भारतात नोकरी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण व्यवसायाची माहिती नसते. तसेच गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते. यामुळे व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्याची आयडिया मनात राहून जाते. तसेच दुसरी गोष्टी म्हणजे नोकरीप्रमाणे व्यवसायातून दर महिन्याला ठरवित रक्कम येण्याची गँरटी नसते. परंतु काही जण धाडस दाखवून आपला उद्योग सुरु करतात. त्यात त्यांना यशही मिळते. तुम्हाला उद्योग सुरु करायचा असले तर कमी पैशांची गुंतवणूक करुन सुरु करता येणारा हा उद्योग समजून घ्या.

काय आहे हा उद्योग

तुम्हाला पेट्रोल पंपासंदर्भात सांगितले तर खूप जास्त गुंतवणुकीमुळे तुम्ही नकार देणार आहे. तसेच पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज असतात. त्यातून तुम्हाला पेट्रोल पंप मिळण्याची शक्यता कमीच असते. परंतु कमी गुंतवणुकीतून तुम्ही पेट्रोल पंपाचे मालक होऊ शकतात. पुणे शहरातील एक स्टार्टअप रिपोस एनर्जीने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी जागेची गरज तुम्हाला लागणार आहे.

कसा असणार हा पेट्रोल पंप

पेट्रोल पंप चालता फिरता असणार असेल. रिपोस एनर्जी (Repos Energy) ने ही आयडिया आणली आहे. फक्त या पंपात डिझेलची विक्री करता येणार आहे. नवी दिल्लीत झालेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये हा चालता फिरता पेट्रोल पंप दाखवण्यात आला. हा डिझेल पंप एका ट्रकवर बसवला आहे. हा 3 हजार, 4 हजार आणि 6 हजार लिटरच्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. महिंद्रा, टाटा किंवा आयशरच्या ट्रकवर हा पंप बसवता येतो.

काय असणार किंमत

चालत्या फिरत्या पेट्रोल पंपाची किंमत 17 लाख रुपये असणार आहे. ट्रक आणि पेट्रोल पंचच्या क्षमतेनुसार त्या किंमतीत बदल होतो. हा पेट्रोल पंप घेण्यासाठी तुम्हाला एक फर्म सुरु करुन त्याचा करार रिपोस एनर्जीसोबत करावा लागणार आहे. मग पुढील काम रिपोस एनर्जी करणार आहे. या प्रक्रियेसाठी 90 ते 120 दिवस लागतात. तुमच्याकडे एक ऑफिस आणि ट्रक उभे करण्यासाठी जागा घ्यावी लागणार आहे.

कुठे होणार सप्लाय

तुमच्या चालत्या फिरत्या डिझेल पंपमधून रस्त्यावर विक्री करता येणार नाही. फक्त व्यावसायिक विक्रीच करता येणार आहे. शाळा, कॉलेज, सोसायटी, कारखाने, हॉस्पिटल, बांधकाम व्यवसाय आणि जनरटेर असणाऱ्या ठिकाणी डिझेलची विक्री करु शकता. तीन हजार लिटरच्या पंपमधून तुम्ही एका दिवसाला दोन हजार लिटर डिझेल विकले तरी चार हजार रुपये कमिशन मिळते. पेट्रोल डिलरलाही लिटर मागे दोन रुपये इतका नफा मिळतो. म्हणजे 30 दिवसांत 1.2 लाख रुपये कमाई होते. खर्च वजा केल्यावर 1 लाख रुपये महिना मिळू शकतो.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.