पुणे : अनेकवेळा तुमचा मोबाईल हरवला जातो किंवा चोरीला जातो. परंतु तो परत कसा मिळवायचा याची माहिती तुम्हाला नसते. आता सायबर सेलने तुमचा मोबाईल परत मिळवण्याचे काम सोपे केले आहे. यामुळे मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर काही पावले उचलून तुम्हाला तो परत मिळवता येणार आहे. सायबर सेलने हजारो जणांना या पद्धतीने मोबाईल परत मिळवून दिले आहेत. तुम्ही चोरीला गेलेला फोन अगदी सोप्या पद्धतीने परत मिळवू शकता. यासाठी जास्त खूप काही धावपळ करण्याची गरज नाही. फक्त पोलिसांत तक्रार नोंदवून ऑनलाईन पोर्टलवर ते अपडेट करावे लागणार. मोबाईल हरवल्यास नेमके काय करावे जाणून घेऊ या.
फक्त असे करा
- आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा. तुम्ही ऑनलाइन देखील फोन चोरी झाल्याची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर एफआयआर कॉपी घेण्यास विसरु नका.
- हरवलेल्या मोबाईलचे सीमकार्ड ब्लॉक करा. परत त्याच क्रमांकाचे नवीन सीमकार्ड घ्या. त्यामुळे तो क्रमांक CEIR वर नोंदवता येईल.
- यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला https://ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाइटवर जावे लागेल.
या वेबसाइटवर साइन करा. यानंतर तुम्हाला तीन पर्यायांपैकी एक Block Stolen / Lost Mobile/unblock found mobile/ check request status असे पर्याय दिसेल. त्यावरील Block Stolen / Lost Mobile क्लिक करा.
- खालील कागदपत्रे जोडावी (साईज ५०० केबीपेक्षा कमी)
- पोलीसात केलेल्या तक्रारीची प्रत
- मोबाईल बिल
- शासकीय ओळखपत्र
- CEIR वर तक्रार नोंदवल्यावर तुम्हाला तक्रार क्रमांक मिळेल
- हरविलेला मोबाईल अॅक्टीव्ह झाल्यावर त्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एसएमएसने मिळेल. ती माहिती तुम्ही पोलिसांना द्यावी. त्यानंतरचे काम पोलीस करतील.