Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजपवर भारी! नेमकी बाजी कशी मारली?

अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कसबाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला आणि तब्बल 28 वर्षांपासूनच्या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची एंट्री झाली.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजपवर भारी! नेमकी बाजी कशी मारली?
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:39 PM

पुणे : कसब्याच्या लढाईत अखेर, काँग्रेसनं बाजी मारली. आणि परंपरागत मतदारसंघात भाजपला जबर धक्का बसला. तब्बल 28 वर्षानंतर कसब्यात रवींद्र धंगेकरांच्या रुपात काँग्रेसचा विजय झाला. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंना 62 हजार 244 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना 73 हजार 284 मतं मिळाली आणि धंगेकरांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर, कसब्यात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपनं टिळकांच्या घरात उमेदवार न देता, हेमंत रासनेंना उमेदवारी दिला.

विशेष म्हणजे, फडणवीस कब्यात तळ ठोकून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही रोड शो झाला. गिरीश बापटांनाही प्रचारात आणलं. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजनांसारखे मंत्रीही कामाला लागले होते. पण भाजपचा जोरदार प्रचार काँग्रेसच्या धंगेकरांना रोखू शकला नाही.

कसब्यातल्या निकालाचा नेमका अर्थ काय?

भाजपनं 28 वर्षांपासूनचा कसबा बालेकिल्ला गमावला. 28 वर्षांनंतर भाजपच्या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसनं एंट्री केली. भाजप-शिंदेंच्या शिवसेना युतीच्या विरोधात कसब्यात मतदान झालं. फडणवीस-शिंदे जोडीच्या विरोधात महाविकास आघाडी सरस ठरली. 2019मध्ये भाजपचा 28 हजारांनी विजय पण साडे 3 वर्षात 11 हजारांनी पराभव झाला. टिळक कुटुंबात तिकीट न दिल्यानं ब्राह्मण समाजाची नाराजी उमटली.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या धंगेकरांच्या बाजूनं महाविकास आघाडी ताकदीनं लढली. गांधीजी आणि नोटा संदर्भातल्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचाही फटका बसला. नगरसेवक धंगेकरांची स्थानिक लोकप्रियता भाजपच्या प्रचारावर भारी पडली. त्यामुळे कसब्यातल्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिंकले.

कसब्यातला पराभव हा भाजपला मोठा धक्का आहे. सत्तांतरानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक होती. त्यातच चिंचवडमध्ये भाजपला विजय मिळाला असला तरी बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपला पराभव झाला. साडे 3 वर्षातच, कसब्यातला मतदार काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूनं उभा राहिला.

कसब्यात 2019 च्या निवडणुकीत दिवंगत भाजपच्या मुक्ता टिळकांना 75 हजार 492 मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या अरविंद शिंदेंनी 47 हजार 296 मतं घेतली होती. 28 हजार 196 मतांनी मुक्ता टिळकांचा विजय झाला होता. आता काँग्रेसच्या धंगेकरांनी बाजी पलटलीय.

भाजपच्या हेमंत रासनेंना 62 हजार 244 मतं, तर धंगेकरांना 73 हजार 284 मतं मिळाली. म्हणजेच साडे 3 वर्षातच कसब्यातल्या जनतेचा कौल बदलला आणि भाजपचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला. कसब्यातला निकाल भाजपला विचार करायला लावणारा आहे. कारण पराभव हा हक्काच्या मतदारसंघातच झालाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.