Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोना नियमावली पायदळी तुडवली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली (Huge crowd at NCP Ajit Pawar program in Pune).

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोना नियमावली पायदळी तुडवली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोना नियमावली पायदळी तुडवली
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 6:50 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली बघायला मिळाली. या गर्दीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करतात. पण त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदडी कशा तुटवल्या जावू शकतात? असा सवाल आता राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय (Huge crowd at NCP Ajit Pawar program in Pune).

राज्य सरकार काय कारवाई करणार? प्रविण दरेकरांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुण्याच्या कार्यक्रमावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “हे दुर्देवी असं चित्र आहे. अजित पवार यांच्यासारखे कठोर प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा याबाबत सूचना केल्या आहेत. आताच अजित पवार यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांनी सांगताना कडक इशारा देतो, असं म्हटलं होतं. मला आता या निमित्ताने सरकारला प्रश्न विचारायचा आहे. आता या कार्यक्रमावर राज्य सरकार कुठली कारवाई करणार? हा प्रश्न आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“मुंबईत लोकलबाबत विचारलं तर तुम्हाला वाट पाहवी लागेल, शक्य नाही, असं सांगितलं जातं. सर्वसामान्य माणूस तुमचं सरकार म्हणून ऐकतो, संकट आहे म्हणून ऐकतो. तुम्ही सर्वसामान्यांना दम देणार, इशारे देणार, कायद्याचे बंधनांची दाख दाखवतात. पण तुमच्याकडून असं कृत्य होत असेल तर लोकांनी तुमचं का ऐकावं? आज पुण्यासारख्या शहरात लोक गुदमरले आहेत”, अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी टीका केली.

सुधीर मुनगंटीवार यांची मिश्किल टीका

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या मुद्द्यावरुन निशाणा साधला. “कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा झाली असावी की जर तुम्ही गर्दी केली तरी मी तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुम्ही जर मुंबईत सर्वसामान्यांसाठी अधिवेशन भरवाल तर मी त्रास देईल. अनेक मंत्री मोर्चात सहभागी झाले. त्यावर काय कारवाई झाली? यावर हेच जमावबंदीचे आदेश लावतात. लग्नात 25 जणांपेक्षा जास्त जण असलेले तर वधू-वरावर गुन्हा दाखल करतात. अशी ही अंधेर नगरी चौपट राजा, गजब सरकरकी अजब कहानी, या सरकारचे हे अजब मंत्री. एकीकडे गर्दी जमवतात दुसरीकडे ज्ञान सांगतात”, असं मुनगंटीवार म्हणाले.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.