वाद ठरले कारण, पत्नीची क्रूरपणे केली हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे येथील फुरसुंगी गावातील साई पॅराडाईज सोसायटीत पत्नीची पतीने हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांमधील वादानंतर हा प्रकार घडला.

वाद ठरले कारण, पत्नीची क्रूरपणे केली हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 1:16 PM

पुणे : पती अन् पत्नीचा चार वर्षांपासून संसार सुरु होता. नगर जिल्ह्यातून येऊन पुणे शहरातील फुरसंगीमध्ये (Pune Crime News) राहत होते. दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपातंर पत्नीच्या खून करण्यापर्यंत गेले. त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीवर खुनाचा गु्न्हा (Murder)दाखल झाला आहे. तसेच आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. अक्षय व स्वाती असे या दाम्पत्याचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अक्षय जाधव (वय २५) व स्वाती जाधव (वय २२ ) यांचा ४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.फुरसुंगी गावातील साई पॅराडाईज सोसायटीत ते राहत होते. त्यांचा भाड्याने गाड्या देण्याचा व्यवसाय होता. बुधवारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या अक्षय याने स्वातीचा गळा दाबून व डोके आपटून खून केला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी हा प्रकार झाल्यानंतर अक्षय अत्यवस्थ होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी जाधव यांचे घर उघडले नाही. शेजाऱ्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांना घटनास्थळी येऊन दार तोडले. त्यानंतर घरात अक्षय अत्यवस्थ असल्याचा आढळून आला. तसेच स्वाती मृत झाली होती. आता अक्षय याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पोलिसात तक्रार

याप्रकरणी स्वातीचे वडिल विनायक मारुती थोरात (वय ३९, रा. साईनगर, अहमदनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात अक्षय जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वातीचा खून करण्यामागचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. अक्षयची प्रकृती बरी झाल्यावर त्याचा जबाब घेण्यात येणार आहे. त्यातून खुनाचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

लोक का करता आत्महत्या

  • डिप्रेशन किंवा नैराश्य
  • मानसिक स्थितीत चढ-उतार
  • सतत चिंता किंवा अस्वस्थता
  • ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं
  • सतत मनात नकारात्मक विचार
  • भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना

आकडे काय सांगतात?

आत्महत्या प्रतिबंधक धोरण तयार करण्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तज्ञांव्यतिरिक्त मानसोपचार तज्ज्ञांचाही मोठा वाटा आहे. डॉ.सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की, एका संशोधनानुसार, भारतात एकीकडे आत्महत्येच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे त्याच वेळेस इतर 200 लोक आत्महत्येच्या विचारात असतात. याच ट्रान्स मध्ये असताना त्या वेळी 15 जणांनी प्रयत्न केले आहेत. म्हणजेच, आत्महत्येची माहिती त्यांना थेट प्रेरणा देत आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.