Pune crime : दारू ढोसून हैवानी कृत्य! पत्नीचं डोकं आपटून अन् गळा आवळून खून; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मद्यपान केलेल्या शिवमने पत्नी अवंतिकाचे डोके भिंतीवर, किचनवर आपटून गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली. तीन वर्षीय चिमुकलीसमोरच वडिलांनी आईचा गळा आवळला.

Pune crime : दारू ढोसून हैवानी कृत्य! पत्नीचं डोकं आपटून अन् गळा आवळून खून; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अवंतिका शर्मा/शिवम पचौरीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 4:05 PM

पिंपरी चिंचवड : पत्नीचा गळा आवळून (Strangled) खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. येथील एका उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून (Murder) केला आहे. आरोपी नेहमीच मद्यपान करायचा आणि त्यानंतर पत्नीला मारहाण करायचा. यातूनच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अवंतिका शर्मा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवम पचौरी असे आरोपीचे नाव असून हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi police) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दोघांनाही तीन वर्षांची मुलगी आहे. मद्यपान केलेल्या शिवमने पत्नी अवंतिकाचे डोके भिंतीवर, किचनवर आपटून गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली. तीन वर्षीय चिमुकलीसमोरच वडिलांनी आईचा गळा आवळला. त्यामुळे ही चिमुकलीही घाबरली होती.

पती-पत्नीमध्ये होत होता वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम हा आयटी कंपनीत काम करत होता. मात्र सध्या तो बेरोजगार होता. शिवम हा दररोज दारू प्यायचा. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी शिवम हा दारू पिऊन आला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले. यातून त्याने पत्नी अवंतिकाचे डोके, भिंतीवर किचनवर आदळले. एवढेच नाही, तर गळादेखील आवळला. त्यामुळे पत्नी अवंतिकाने प्राण सोडले. हे सर्व घडत असताना त्यांची तीन वर्षीय मुलगीदेखील समोरच होती. या प्रकारानंतर शिवमने पोलिसांना स्वतः बोलावून घेतले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी शिवमला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

आधीही घडली होती घटना

मागील मार्च महिन्यात अशीच एक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळेत घडली होती. पत्नीला मारहाण करून तिचा खून करण्याचा प्रयत्न एकाने केला होता. घरातील अतिशय क्षुल्लक कारणावरून वाद टोकाला गेला. हत्येचा प्रयत्न केल्यानंतर पती स्वत: चिंचवड पोलीस ठाण्यात हजर झाला होता. चिंचवड पोलिसांनी आरोपीला देहू रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. तिथे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.