Pimpri Chinchwad crime| ‘शहारात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे मला मान्य’ – आयुक्त कृष्णप्रकाश यांचा खुलासा

स्ट्रीट क्राइम मध्ये तर झपाट्याने वाढ झाली आहे.  एमआयडीसी पट्ट्यात कामगारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. लुटमार करण्याच्या उद्देशानेच भोसरी येथील खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. त्यामुळे आता तरी आयुक्त त्या कडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आयुक्त कृष्ण प्रकाश हे मात्र एका वाहिनीच्या "किचन कलाकार " या शो मध्ये व्यस्त आहेत.

Pimpri Chinchwad crime|  'शहारात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे मला मान्य' - आयुक्त कृष्णप्रकाश यांचा खुलासा
Krushan Prakash
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 7:09 PM

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad)कायदा सुव्यवस्था ढासळत चालल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे गोळीबार, खून, एटीएम चोरीच्या घटना, वाढत असताना पोलिसांवर हल्ल्याच्या(attack) घटना ही वाढत चालल्या आहेत. चाकण मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार केला, तर उर्से टोल नाक्यावर दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गाडी घालण्यात आली. तर दुसरीकडे तरुणांचा गुन्हेगारीकडे कल वाढत चालला असून पोलिसांनी गेल्या काही दिवसात सत्तर हुन अधिक पिस्टल पकडण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागलीय. तर दुसरीकडे आयुक्त कृष्ण प्रकाश(police Commissioner Krishnaprakash) यांनी कायदा सुव्यवस्था काहीशी बिघडल्याच मान्य केलंय.

शहारत गुन्हेगारी सुरूच

चाकण येथे सराईत गुन्हेगारांनी आयुक्तांवर गोळ्या झाडण्याच धाडस केल होत. त्यानंतर, आयुक्तांनी बाहुबली होत चक्क त्यांच्यावर झाड फेकून त्यांना ताब्यात घेतलं. गुन्हेगार आणि त्यांच्यात झटापट झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी तेव्हा सांगितल. या घटनेनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल म्हणून जखमी असलेले पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश काही दिवसांसाठी अलिप्त झाले होते. परंतु, शहरात गुन्हेगारी सुरूच राहिली.

कायदा सुव्यस्था सुधारण्याकडे लक्ष देण्याची मागणी त्याच उदाहरण म्हणजे, दोन दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील आढले येथे एका तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर मात्र आयुक्तांनी आयुक्तांनी कायदा सुव्यस्था बिघडल्याचे मान्य केल. असे असले तरी शहरात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे ही जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच असल्याचे मात्र ते विसरत चालले आहेत. प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी त्यांची चाललेली धडपड, त्यामुळे त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन कडे दुर्लक्ष होऊन शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. स्ट्रीट क्राइम मध्ये तर झपाट्याने वाढ झाली आहे.  एमआयडीसी पट्ट्यात कामगारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. लुटमार करण्याच्या उद्देशानेच भोसरी येथील खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. त्यामुळे आता तरी आयुक्त त्या कडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आयुक्त कृष्ण प्रकाश हे मात्र एका वाहिनीच्या “किचन कलाकार ” या शो मध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे शहराची गुन्हेगारी मुळे बिघडलेली घडी ते पुन्हा दुरुस्त कधी करतात हे पाहणं महत्वाचं आहे.

शहरातिला वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यका आहे. पोलिस आयुक्तांनी चमकोगिरी करण्यापेक्षा कायदा सुव्यस्था सुधारण्याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

Congressचे 27 नगरसेवक Ajit Pawar यांच्या उपस्थितीत NCPमध्ये प्रवेश करणार

VIDEO: किरीट सोमय्या भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान

Police Medal : तब्बल 51 मराठमोळ्या पोलिसांचा पदकाने सन्मान, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.