Pune Sharad Pawar : मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही; एका वाक्यात शरद पवारांनी पुण्यात राज ठाकरेंचा विषय काढला निकाली!

औरंगजेब (Aurangzeb) कबर आणि इतर मुद्द्यांवरून त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच आपण बोलून अधिक महत्त्व द्यायचे नाही, असा टोलाही लगावला आहे.

Pune Sharad Pawar : मला त्यांचं महत्त्व वाढवायचं नाही; एका वाक्यात शरद पवारांनी पुण्यात राज ठाकरेंचा विषय काढला निकाली!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 4:57 PM

पुणे : मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही, या एका वाक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय निकाली काढला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावत भाषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर औरंगजेब (Aurangzeb) कबर आणि इतर मुद्द्यांवरून त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच आपण बोलून अधिक महत्त्व द्यायचे नाही, असा टोलाही लगावला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशन समारंभास आले असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली पण अधिक बोलण्यास मात्र नकार दिला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

शरद पवार यांना औरंगजेब सुफी संतच वाटत असेल तर काय बोलायचे? सुफी संत अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता. मग काय शिवाजी महाराज मध्ये आले होते का, असा सवाल त्यांनी केला. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तर भाषणाच्या सुरुवातीला पावसातल्या शरद पवार यांच्या भाषणावरून त्यांना टोला लगावला होता.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांची प्रतिक्रिया ऐका

‘बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताय’

शरद पवार सांगतात, आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री शिवसेनाप्रमुखांसोबत जेवायचो. तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढीही अक्कल नाहीये, तुम्ही कुणाबरोबर राहताय. लोकांना वाटेल यांचे खोटे खोटे भांडण चालायचे. पण हे सत्तेत इकते मश्गूल आहेत, की त्यांना कशाचीही पर्वा नाही. कारण जनता बेपर्वा आहे. लोक विसरतात आणि भलत्या गोष्टीवर मतदान होते, अशी खोचक टीकाही त्यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. मात्र शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोलणे टाळले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.