आयएएस पूजा खेडकर…बॅच 2023, प्रशिक्षणार्थी IAS असताना देशभरात चर्चेत, जाणून घ्या A टू Z माहिती

पूजा खेडकर यांची चर्चा त्यांच्या कामगिरीमुळे होत नाही तर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या कारनाम्यांमुळे बातम्यांच्या विषय बनल्या आहेत. काय आहे पूजा खेडकर प्रकरण? त्यांच्या मागण्या काय होत्या? त्यांना ते अधिकार होते का? आयएएसची मॉर्क मुलाखत का झाली व्हायरल? आयएएससाठी दिलेल्या प्रमाणपत्रांवर का निर्माण झाला संशय? या प्रकरणात पुढे काय होणार?

आयएएस पूजा खेडकर...बॅच 2023, प्रशिक्षणार्थी IAS असताना देशभरात चर्चेत, जाणून घ्या A टू Z माहिती
pooja khedkar
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 2:26 PM

आयएएस, आयपीएस, आयएफएस या परीक्षांचे आकर्षण देशभरातील तरुणांना असते. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करुन यश मिळवता येते. चतुरस्रा व्यक्तिमत्त्वाचा विकास करुन या परीक्षेतील यशाला गवसनी घालता येते. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील असलेली आयएएस डॉक्टर पूजा खेडकर चर्चेत आल्या आहेत. पूजा खेडकर यांची चर्चा त्यांच्या कामगिरीमुळे होत नाही तर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्या बातम्यांच्या विषय बनल्या आहेत. काय आहे पूजा खेडकर प्रकरण? त्यांच्या मागण्या काय होत्या? त्यांना ते अधिकार होते का? आयएएसची मॉर्क मुलाखत का झाली व्हायरल? आयएएससाठी दिलेल्या प्रमाणपत्रांवर का निर्माण झाला संशय? या प्रकरणात पुढे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

पूजा खेडकर यांना यूपीएससीमध्ये किती गुण मिळाले

अहमदनगर जिल्ह्यातीतील पाथर्डीमधील भालगाव येथील पूजा खे़डकर कुटंबीय आहेत. त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या आई मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकवले होते. त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. त्या भालगावच्या सरपंचही राहिल्या होत्या. थोडक्यात आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्या संपूर्ण कुटुंबाची चर्चा माध्यमांमधून होत आहे. आयएएस परीक्षेत पूजा खेडकर यांना ऑल इंडिया रँक 821 मिळाली होती. त्यांनी परीक्षेत एकूण 914 गुण मिळवले. त्यात मुलाखतीत 171 तर मुख्य परीक्षेत 743 गुण मिळवले आहे. 2022 मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून आयएएस पदासाठी त्यांनी परीक्षा दिली. त्यापूर्वी 2021 मध्ये त्या ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’मध्ये सहायक संचालक होत्या.

pooja khedakar

पूजा खेडकर का आल्या चर्चेत

एमबीबीएसचे शिक्षण घेतलेल्या पूजा दिलीप खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. परंतु त्यांच्या निवडीवरच प्रश्न निर्माण होत आहे. एकतर त्यांनी अपंगात्वाचे दिलेले प्रमाणपत्र, दुसरी कोट्यावधींची संपत्ती आणि उत्पन्न असताना आठ लाखांचे उत्पन्न दाखवून मिळवलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि तिसरे मुलाखतीमधील प्रश्नांची उत्तरे आली नसताना झालेली निवड…पूजा खेडकर यांना मुलाखतीमध्ये महाराष्ट्राशी संबंधित 2 प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या महिलांची गर्भपिशवी काढून टाकण्याचा होता. परंतु त्यांची माहिती पूजा खेडकर यांना नव्हती. तसेच मॉर्क मुलाखतीत आई-वडील विभक्त राहत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकर यांचा प्रवास असा सुरु झाला

पूजा खेडकर यांना परीविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली. प्रशिक्षणार्थी असताना प्रशासनाचे कामकाज समजून घेण्याची प्रक्रिया असते. प्रशिक्षण कालावधीत त्यांना फक्त शिकण्याचे काम असतात. अधिकार काहीच नसतात. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण कामकाजाची माहिती घेणे आवश्यक असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर काही पदांवर एक-एक महिन्याकरता नियुक्ती केली जाते. त्यावेळी त्या पदाचे अधिकार मिळतात. त्या 3 जून रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या अन् आपले कारनामे दाखवू लागल्या. 27 आणि 28 जून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण दांडी मारली. त्यानंतर 24 ते 26 जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रशिक्षण होते. तेव्हा शासकीय वाहनांची मागणी केली. पुढे जाऊन ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत विविध पोलीस ठाण्यात जाताना शासकीय वाहनाऐवजी स्वत:चे वाहन वापरत होत्या.

मागण्या अशा सुरु केल्या

पुण्यात रूजू झाल्यानंतर आयएएसपणाची नशा पूजा खेडकर यांच्या डोक्यात गेली. त्यांनी अवास्तव मागण्या सुरु केल्या. स्वतंत्र दालन देण्याची ऑर्डर दिली. पुढे जाऊन हव्या त्या सुविधा मिळवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना धमकी दिली. अपर जिल्हाधिकारींची परवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत अँटी चेंबर ताब्यात घेतले. खरंतर त्यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात चौथ्या मजल्यावर कुळकायदा शाखेत स्वतंत्र कक्ष दिला होता. पण बाथरुम नसल्यामुळे तो कक्ष त्यांनी नाकारला. त्यानंतर वडील दिलीप खेडकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. त्यात खनिकर्म शाखेशेजारील जोड बाथरुम असलेला व्हिआयपी सभागृह शोधला. त्या ठिकाणी आपले बस्तान मांडले. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटींग बदलून देण्याची मागणी केली. मात्र ते शक्य नसल्याचे सांगितल्यावर पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सर्वसाधारण शाखेचे तहसीलदारांना धमकी दिली. तुमची शासकीय सेवा होईपर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारीपर्यंत पोहचू देणार नाही. खेडकर मॅडम येण्यापूर्वी त्यांची बसण्याची व्यवस्था करा. तसेच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर अपेक्षित सुविधांबद्दल मेसेज केले. परंतु प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना या सुविधा मिळत नाहीत. केवळ निवासस्थानाची व्यवस्था केली जाईल, असे त्यांना स्पष्ट केले गेले होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारींच्या चेंबरमधील सामान काढले

13 जून 2024 ला पूजा खेडकर यांनी पुन्हा वडिलांबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जागेची पाहणी केली. शेवटी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. 18 जून ते 20 जून या काळात पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शासकीय कामकाजासाठी मंत्रालयात होते. या काळात पूजा खेडकर यांनी कहर केला. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारींच्या अँटी चेंबरमधील सर्व सामान काढून टाकले. त्यानंतर त्या ठिकाणी स्वत:च्या नावाचा बोर्ड लावला. पुढे जाऊन आपणास लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, राजमुद्रा देण्याची मागणी केली. मग जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पूजा खेडकर यांच्यासंदर्भात लेखी तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार नोंदवली.

थेट जिल्हाधिकारींना मेसेज

पूजा खेडकर यांनी केलेल्या प्रतापाची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष पूर्ववत करण्याचा आदेश दिला. मग पूजा खेडकर चांगल्याच संतापल्या. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला की, “तुम्ही जर मला चेंबरमधून बाहेर काढले तर माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो मला सहन होणार नाही.” जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या हक्कांपेक्षा आपली कर्तव्य महत्त्वाची असल्याचे सांगितले.

अन् उघड झाली ही प्रकरणे

पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर त्यांची दुसरी प्रकरणे समोर येऊ लागली. त्यांनी यूपीएससीकडे तीन प्रतिज्ञापत्र दिली होती. पहिल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ‘दृष्टीदोष’ असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात डोळ्याची समस्या दाखवली. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात ओबीसी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र दिले. ज्वाईन होण्यापूर्वी त्यांना सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले होते. परंतु ती दिली नाही. त्यानंतर त्यांची निवड कशी झाली? हा प्रश्न आहे. आयएएससाठी ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी दिले. मात्र, त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्या निवडणूक शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले होते. तसेच पूजा यांच्याकडे 22 कोटींची अचल संपत्ती आहे. यामुळे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रावर कसे मिळाले? हा प्रश्न आहे. पूजा खेडकर कुटुंबियांकडे 110 एकर जमीन, 7 फ्लॅट्स, 1 लाख स्केअर फुटाची 6 दुकाने आहेत. पूजा खेडकर यांचा पुण्यातील बाणेर परिसरात आलिशान बंगला आहे, ज्या बंगल्यात एकूण 5 चारचाकी वाहने आहेत. मग 8 लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळवले? हे एक गूढ आहे.

पूजा खेडकर यांची संपत्ती किती

पूजा खेडकर या सुमारे 22 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक आहेत. 2023 मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी सरकारला त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या तपशील दिला. त्यानुसार, 2015 मध्ये पुणे येथे 2 भूखंड खरेदी केले. यामध्ये त्यांनी एक प्लॉट 42 लाख 25 हजार रुपयांना तर दुसरा प्लॉट 43 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केला. सध्या दोन्ही भूखंडांचे बाजारमूल्य सहा ते आठ कोटींच्या दरम्यान आहे. 2018 मध्ये पुण्यातील धानेरी परिसरात 4.74 हेक्टर जमीन 20 लाख 79 हजार रुपयांना खरेदी केली होती. त्याची सध्याची किंमत 3 ते 4 कोटी रुपये आहे. 2020 मध्ये 724 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट 44 लाख 90 हजार रुपयांना खरेदी केला होता, ज्याची किंमत सध्या 75 लाख रुपये आहे. तसेच अहमदनगरमध्येही तीन मालमत्ता आहेत. यापैकी त्याच्या आईने त्याला 2014 मध्ये दोन जमिनी भेट म्हणून दिल्या. त्यांची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे. पूजाने स्वत: 2019 मध्ये सावेडी येथे 20 लाख 25 हजार रुपयांना जमीन खरेदी केली होती. सध्या त्याची किंमत 45 लाख रुपये आहे. पूजा सर्व 7 मालमत्तांमधून दरवर्षी सुमारे 42 लाख रुपये कमावत आहे. त्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

आता पुढे काय होऊ शकते

IAS पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली, असे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांच्या विरोधात कलम 318(4), कलम 336 (3) आणि कलम 340 (2) नुसार एफआयआर दाखल होऊ शकतो. ही सर्व कलमे फसवणूक, बनावट कागदपत्रे याच्या संदर्भातील आहेत. या गुन्ह्यात दोष सिद्ध झाल्यास अजीवन कारावास होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सध्या तीन पातळ्यांवर चौकशी सुरु आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर यांची मुलाखत अन् प्रमाणपत्रच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचा अधिकारी दोन आठवड्यात चौकशी करुन अहवाल देणार आहे. दुसरी चौकशी सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी (LBSNAA) ही संस्था करणार आहे. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांनी चौकशी आणि कारवाई सुरु केली आहे. त्यांनी गाडीवर अंबर दिवा लावल्यामुळे 27 हजार रुपये दंड केला. तो त्यांनी भरला आहे. बाणेर रोडवर नॅशनल हाऊसिंग सोसायटीत खेडकर यांचा करोडो रुपये किंमत असलेला ओम दिप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरात काही भाग हा अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे मनपाकडून तपासणी करण्यात आली.

पूजा खेडकर यांनी सरकारी नोकरीत असताना एका कंपनीची स्थापन केली आहे. त्यांची पूजा ऍटो नावाची कंपनी आहे. सरकारी नोकरीत असताना स्वत:ची कंपनी स्थापना करता येत नाहीत, त्यानंतरही पूजा खेडकर यांनी कंपनी तयार केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर पूजा खेडकर यांनी पुणे येथून वाशिममध्ये बदली करण्यात आली. वाशिममध्ये गेल्यावर माध्यमांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले. तर शासकीय नियमानुसार मला बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची बाजू आपण समितीसमोर ठेवणार असल्याचे पूजा खेडकर यांनी म्हटले आहे.

पूजा खेडकर यांच्या वडिलांवर कारवाई होणार?

पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांचे वडिलांसंदर्भात चौकशी सुरु होणार आहे. त्यांची वडिलांनी दिलेली धमकीचा अहवाल जिल्हाधिकारी वरिष्ठांना पाठवणार आहे. त्यानंतर दिलीप खेडकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या आई मनोरम खेडकर यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकी देण्याचा प्रकार उघड झाला.  2023 मधील जून महिन्यातील हा प्रकार होता. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, 3, 25 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तज्ज्ञ काय म्हणतात…

ज्येष्ठ सनदी अधिकारी (निवृत्त) अरूण भाटिया यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले की, पुजा खेडकर प्रकरणी एवढा सगळा फर्जीवाडा समोर येऊनही अद्याप गुन्हा का दाखल नाही. अनेक आयएसएस अधिकारी हे भ्रष्ट असतात पण शासन त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही म्हणूनच पूजा खेडकर सारख्या प्रोबेशनर अधिकाऱ्यांची सिस्टीमला वाकवण्याची हिम्मत वाढते, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रशिक्षण सुरु असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 25 ते 30 आठवडे काम करावे लागते. या कालावधीत विविध प्रशासकीय कार्यालयातील अनुभव घेतला जातो. त्यानंतर राज्यातील सचिवालयात एक आठवडा काम करावे लागते. तसेच ग्रामीण भागातील अभ्यास दौरे करावे लागतात. ज्या राज्यात नियुक्ती असले ती भाषा शिकणे आवश्यक असते. पूजा खेडकर यांनी केलेल्या मागण्या अवास्तव असून त्यांच्या पूर्ततेबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही, असे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.