IAS पूजा खेडकर यांच्या आई माध्यमांवर धावून आल्या… कॅमेऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

ias pooja khedkar news: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर त्यांची पुण्यातून बदली झाली. या बदलीनंतर त्यांना वाशिममध्ये रुजू होण्याचे आदेश दिले होते. अखेर गुरुवारी त्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या. त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले.

IAS पूजा खेडकर यांच्या आई माध्यमांवर धावून आल्या... कॅमेऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
pooja khedkar
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 5:28 PM

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कारनामे गाजत असताना तिच्या आईने धक्कादायक प्रकार केला आहे. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते. त्यासंदर्भातील चित्रिकरण करण्यासाठी माध्यमे पोहचली. परंतु आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या. मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला. मनोरमा खेडकर माध्यमांच्या कॅमेऱ्यांना चित्रीकरणास विरोध करत होत्या. त्यामुळे मुलगी तर मुलगी परंतु तिच्या आईने कळस गाळला.

पुणे पोलिसांनी का केली कारवाई

पूजा खेडकर यांच्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती. तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी 21 हजार रुपयांचा दंड केला. पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहचले. त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या. कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

अखेर वाशिममध्ये झाल्या रूजू

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर त्यांची पुण्यातून बदली झाली. या बदलीनंतर त्यांना वाशिममध्ये रुजू होण्याचे आदेश दिले होते. अखेर गुरुवारी त्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्या. त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांना विचारले. मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. आपण आज रुजू झालो आहोत, वाशिममध्ये आल्याचा आनंद आहे. पुढील वर्षभर कार्यरत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रश्नांची उत्तरे कशी मिळणार

प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा गृहजिल्हा सर्वात शेवटी मिळतो. परंतु पूजा खेडकर यांना सुरवातीलाच पुणे जिल्हा कसा मिळाला? हा एक मोठा गौडबंगाल आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी विरोधात याचिका दाखल केली होती. त्या सहा वेळा वैद्यकीय चाचणीत गैरहजर होत्या. त्यानंतर त्यांना कसे घेतले, हा एक प्रश्न आहे.

IAS पूजा खेडकर वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख, तरीही नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र 

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....