मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, पॅरोलवरील आरोपीच्या स्टेटसने खळबळ

मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, असा स्टेटस ठेवलेल्या पॅरोलवरील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, पॅरोलवरील आरोपीच्या स्टेटसने खळबळ
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 11:41 AM

इचलकरंजी : इचलकरंजी शहरामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने व्हाट्सअप स्टेटसद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी आकाश संजय वासुदेव (वय 27 रा. भोनेमाळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. दीपक कोळेकर खून प्रकरणातील संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश संजय हा व्हॉट्स अ‌ॅपवर स्टेटसद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. (ichalkaranji Attempt to intimidate by status from accused who escaped on parole)

10 डिसेंबर 2019 रोजी स्टेशन रोडवरील इदगाह मैदान परिसरात पूर्ववैमनस्यातून दीपक महादेव कोळेकर (वय 26 रा. राधा कन्हैय्या प्रोसेसमागे लक्ष्मी वसाहत कोरोची) याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी आकाश वासुदेव, अक्षय नरळे, मेहबूब उकले, आदिनाथ बावणे, सुनिल वाघवे, कासिम नदाफ आणि सागर आमले या सातजणांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्वजण जामिनावर बाहेर आहेत.

या खूनाच्या घटनेला वर्ष झाल्याच्या निमित्ताने आकाश वासुदेव याने व्हॉटस्अपवर ‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्‍या वादाची तयारी सुरु’ अशा आशयाचा व्हिडिओ स्टेटस् म्हणून ठेवला होता. या संदर्भातील माहिती पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी यांना समजल्यानंतर त्यांच्या आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर यांच्या पथकाने वासुदेव याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले.

आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. शहर आणि परिसरात फेसबुक, व्हॉटस्अप, ट्विटर अशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून गुन्हेगारीस अनुसरुन दोन टोळ्यांमध्ये वाद भडकवणाऱ्या पोस्ट, फोटो, हत्याराचे फोटो वापरल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक महामुनी यांनी सांगितले. (ichalkaranji Attempt to intimidate by status from accused who escaped on parole)

हे ही वाचा :

सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ काही तासात उकललं, बोरांच्या वाटणीवरुन मित्रानेच संपवलं

जळगावात भाजपला पुन्हा हादरा, दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांची सोडचिठ्ठी

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.