पुणे : खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी घडलेल्या दुर्घटनेनंतर सत्ताधारी अडचणीत आले आहे. या प्रकारानंतर विरोधक सरकारवर टीका करत असताना मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु या प्रकारानंतर हवामान विभागाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हवामान विभाग फक्त तापमान देणार नाही तर हीट इंडेक्स म्हणजेच शहरांचे फील लाइक टेम्परेचर देणार आहे. अमेरिकेत या पद्धतीचा अवलंबन केला जातो. यामुळे तापमानाबरोबर लोकांना आद्रता समजणार आहे.
का बदल करण्याची पडली गरज
नवी मुंबई येथील खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर उष्मघाताने १४ जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी केवळ तापमान जास्त नव्हते तर आर्द्रताही सुमारे 80 टक्के होती. त्यामुळे तेथील हीट इंडेक्स वाढला. या हीट इंडेक्सचा परिणामामुळे उष्माघाताचा त्रास अनेकांना झाला. हवामान विभागाने ही बाब गांभिर्याने घेतली. त्यानंतर देशभरातील सर्वच ठिकणाचा हीट इंडेक्स जाहीर करणार आहे.
का झाला उष्मघाताचा त्रास
खारघरमध्ये लोकांना उष्णघाताचा त्रास का झाला? यावर बोलताना पुणे येथील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, खारघर येथे केवळ तापमान हा घटक कारणीभूत नव्हता. त्यावेळी तापमानाबरोबर आर्द्रतेचा अतिरेक कारणीभूत होता, त्याला हीट इंडेक्स (एच.आय.) म्हणतात.
त्या दिवशी हीट इंडेक्स हा 55
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या दिवशी खारघरचा हीट इंडेक्स हा 55 होता. तो घातक प्रकारात मोडतो. शहराचे तापमान 35 तर आर्द्रता तब्बल 80 टक्के होती. त्यामुळे घाम आला तरी तो सुकत नव्हता. त्यामुळे शरीरही थंड होत नव्हते, ते फक्त गरम होते गेले, असे डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.
अमेरिकेच्या धर्तीवर प्रणाली
हवामान विभागाने अमेरिकी हवामान संस्था एनओएएच्या धर्तीवर भारतीय शहरांचा हीट इंडेक्स म्हणजे फील लाइक टेम्प्रेचर जारी करणे सुरू केले आहे. यात तापमानासह हवेतील आर्द्रता जोडून लोकांना जाणवणाऱ्या तापामानाची तुलना केली जाते.
हे ही वाचा
Maharashtra Temperature : तापमानातून दिलासा, पण चार दिवस गारपीट अन् अवकाळीचे संकट