शेतकऱ्यांनो सतर्क राहा, राज्यात पुन्हा पावसाचे संकट

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाला आहे.

शेतकऱ्यांनो सतर्क राहा,  राज्यात पुन्हा पावसाचे संकट
राज्यात पावसाचा अंदाजImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:02 AM

पुणे : राज्यात फेब्रुवारी महिना सर्वात हॉट ठरला होता. १९०१ नंतर आतापर्यंतचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना राहिला होता. फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान २९.५ अंश सेल्सियसवर गेले होते. १९०१ नंतर हे सर्वाधिक सरासरी तापमान होते. यामुळे यंदा मार्चमध्येही तापमानाचा नवा विक्रम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात पावसाने झाली. आता पुढील चार दिवस पुन्हा राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे आणि जालन्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने यांनी १४ ते १८ मार्चसाठी हा इशारा दिला आहे. त्यानुसार, १४ ते १८ मार्च दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

नंदुरबारमध्ये पाऊस

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाला आहे. नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात नारळाचा झाडावर वीज पडल्याने झाड जळाले आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नवापूर तालुक्यात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाला सुरवात झाली.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

राज्यात पाऊस पडणार आहे, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. शेतीमालाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे शेतातील पिकांवर रोगराई पसरण्याचा धोका आहे. शेतातील काढणीआणि लागलीच मळणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

‘ला-नीना’ निरोप

सलग तीन वर्षे चांगला मान्सून दिल्यानंतर ‘ला-नीना’ निरोप घेतला. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. याच काळात जूनमध्ये मॉन्सून दाखल होतो. जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा असतो. अमेरिकेच्या हवामान विभाग नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने दिलेल्या अहवालात हा इशारा दिला आहे. आता पुढील तीन महिने मध्य फेब्रुवारी ते मध्य एप्रिलदरम्यान एनसो-न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अल निनोचा भारतातील मान्सूनच्या पावसावर थेट परिणाम होणार असल्याचे NOAAने म्हटले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात अल निनोबाबत अमेरिकेच्या हवामान संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारीमध्येही एजन्सीने असाच अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जानेवारीच्या अहवालात जुलैनंतर अल निनोची स्थिती निर्माण होईल, असे म्हटले होते.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.