अण्णाभाऊ साठे सभागृहातील लाऊड स्पिकर्स चोरणाऱ्यांना तत्काळ अटक करा; झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी

कोट्यवधी रुपये खर्च करून या सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र महापालिकेकडून अण्णाभाऊच्या स्मारकाची व सभागृहाची हेळसांड होत आहे. त्याच्या देखभालीकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. महापालिकेचा हा कारभार कधीही खपवून घेतला जाणार नाही.

अण्णाभाऊ साठे सभागृहातील लाऊड स्पिकर्स चोरणाऱ्यांना तत्काळ अटक करा; झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी
झोपडपट्टी सुरक्षा दल
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 5:37 PM

पुणे- पद्मावती परिसरातील अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाची व नाटयगृहाची दुर्दशा आणि दोन कोटी रुपये किंमतीच्या अत्यंत मोलाचे लाऊडस्पिकर्स सिस्टीम चोरणाऱ्या अटक करा. अशी मागणी करत झोपडपट्टी सुरक्षा दला तर्फे अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट म्हणाले की अण्णाभाऊ साठेंच्या सभागृहातील स्पिकर्स चोरीची घटना व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताखेरीज होणे शक्य नाही. मात्र महापालिका केवळ कागदी घोडे नाचवत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून या सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र महापालिकेकडून अण्णाभाऊच्या स्मारकाची व सभागृहाची हेळसांड होत आहे. त्याच्या देखभालीकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. महापालिकेचा हा कारभार कधीही खपवून घेतला जाणार नाही.

यापुढे तीव्र निषेध होईल या स्मारकाची तसेच सभागृहाची  शान जपली गेली पाहिजे . येथे भविष्यात येथील  कोणताही घटना अण्णाभाऊंचा अवमान समजला जाईल आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदविली जाईल.महापालिकेकडून बसवण्यात आलेली तब्बल २ कोटी रुपये किमतीचे उत्कृष्ट दर्जाचे स्पीकर अण्णाभाऊ साठे सभागृहातून चोरीला गेल्याची घटना नुकतीस उघडकीस आली आहे. या घटनेनंतर महापालिकेतही बराच गोधंळ निर्माण झाला होता.

दोषींवर तात्काळ कारवाई करा या घोटाळयातील व्यवस्थापक , कर्मचारी आणि रखवालदार यांना तात्काळ अटक करुन , मुख्य बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन योग्य ती उपाययोजना करेल अशी अपेक्षा आहे . अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा भगवानराव वैराट यांनी दिला आहे.

भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

पवार-फडणवीस दिल्लीत अमित शहांना भेटले?, फोटो व्हायरल; पण सत्य काय?

भिडेवाड्यात आद्य मुलींची शाळा उभारण्याचे नियोजन : छगन भुजबळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.