AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलसंपदा विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्व धरण प्रकल्प, कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार

ड्रोनमुळे सर्वेक्षणासाठी मुनष्यबळ अत्यंत कमी लागणार आहे. यामुळे मनुष्यबळाद्वारे सर्वेक्षणाच्या कामासाठी होणार वेळखाऊपणा वाचणारा आहे. याबरोबरच मोजणीमध्ये पारदर्शकता येणार आहे.

जलसंपदा विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्व धरण प्रकल्प, कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 8:00 AM

पुणे – राज्यातील जलसंपदा विभागाने (Department of Water Resources)सर्व धरण प्रकल्प, कालवे यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण (Drone survey) करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे लाभ क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामुळे धरण प्रकल्पाचा जीआयएस(GIS  नकाशा तयार होणार आहे. कालव्यातून अथवा नदीद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपसा करून शेती करणाऱ्यांची माहिती, एकूण लाभार्थ्यांची संख्या, लागवडी खालील पिकांचे क्षेत्र आदींची माहिती एकत्रित मिळणार आहे. यामुळे सिंचन पाणीपट्टी आकारणी, त्याची वसुली तसेच पिकांच्या नोंदी ठेवणेसहज शक्‍य होणार आहे.

असा राबवणार प्रकल्प

जलसंपदा विभागाकडून राज्यातील सर्व धरण प्रकल्पांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जाईल. हे ड्रोन सर्वेक्षण एकदाच करण्यात येणार आहे. त्यानंतर सिंचन व्यवस्थापन प्रणालीमधून विकसित होणाऱ्या मोबाइल ऍपद्वारे पिकांच्या नोंदी केल्या जातील . त्यानुसार पाणीपट्टी आकारणी व वसुली केली जाणार आहे.

जलद गतीनं काम होणार

ड्रोनमुळे सर्वेक्षणासाठी मुनष्यबळ अत्यंत कमी लागणार आहे. यामुळे मनुष्यबळाद्वारे सर्वेक्षणाच्या कामासाठी होणार वेळखाऊपणा वाचणारा आहे. याबरोबरच मोजणीमध्ये पारदर्शकता येणार आहे. अनेकदा जमिनीवर उभे असलेले पीक व आकारणीची कार्यवाही झाल्यानंतर पीक निघून गेल्यानंतर कोणतेही पुरावे शिल्लक राहत नाही. त्यामुळे कागदपत्रीय माहितीवर अवलंबून पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करावी लागते मात्र ड्रोन सर्वेक्षणामुळेही समसया सुटणार आहे. सिंचन क्षेत्राची मोजणी करणे व पीक क्षेत्र निश्‍चित करणे यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

Osmanabad | सक्षणा सलगरांच्या जाचाला कंटाळून पक्ष सोडला, भाजप आक्रमक, जि. परिषदेत गोंधळ, उस्मानाबादेत काय घडतंय?

Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर

पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.