Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandani Chowk : चांदणी चौकातली कोंडी फुटणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या जड वाहतुकीला 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत दोन्ही पोलीस आयुक्तालयाच्या सीमेवर नियंत्रित करण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील वाहतुकीवरील अतिरिक्त ताण दूर होण्यास मदत होईल.

Chandani Chowk : चांदणी चौकातली कोंडी फुटणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर...
चांदणी चौक परिसरातील पाहणी करताना अधिकारी आणि पोलीस वर्गImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 4:02 PM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक (Chandani Chowk) परिसराला भेट देऊन वाहतुकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील 15 दिवसात परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात स्थानिक प्रवाशांनी साताऱ्याला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ याची दखल घेत संबंधित सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी करून प्रवाश्यांची समस्या सोडवण्याचे निर्देश दिले होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक

चांदणी चौक परिसराला भेटीनंतर वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले आदी उपस्थित होते.

लेनची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा

पश्चिमेकडून येणाऱ्या 9 लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतूकीची समस्या निर्माण होते. हे लक्षात घेऊन बैठकीत लेनची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश विक्रमकुमार आणि डॉ. देशमुख यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

वाहतूक नियंत्रणासाठी 100 मार्शल

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांलयाकडून प्रत्येकी 50 असे एकूण 100 मार्शल वाहतूक नियंत्रणासाठी नेमण्यात येणार आहे. चांदणी चौकातील पूल नियंत्रीत ब्लास्टिंग पद्धतीने 15 दिवसात पाडण्यात येईल. त्यानंतर त्वरीत नवीन लेन सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी पुलाजवळील पाणी पुरवठ्याच्या वाहिनीला पर्यायी वाहिनीचे काम करण्यात येईल.

सर्व्हिस रोड सुरू होण्यास मदत

वेदशाळेच्या जागेविषयी पुणे महानगरपालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नेमून स्थगिती आदेश रद्द करण्याविषयी विनंती करण्यात येईल, जेणेकरून सर्व्हिस लेनसाठी जागा उपलब्ध होऊ शकेल. उच्च न्यायालाच्या निर्देशानुसार 1 सप्टेंबरनंतर श्रृंगेरी मठ परिसरातील 548 चौ. मीटरपैकी 270 चौ. मीटर ताबा मिळणार असल्याने सर्व्हिस रोड सुरू होण्यास मदत होणार आहे.

जड वाहतुकीला नियंत्रित करणार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या जड वाहतुकीला 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या कालावधीत दोन्ही पोलीस आयुक्तालयाच्या सीमेवर नियंत्रित करण्यात येणार आहे, जेणेकरून शहरातील वाहतुकीवरील अतिरिक्त ताण दूर होण्यास मदत होईल.

डांबरीकरणाचे काम पुढील 7 दिवसात पूर्ण करणार

मुळशी ते सातारा मार्गावरील चांदणी चौकातील डांबरीकरणाचे काम पुढील 7 दिवसात पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. यामुळे पुणे शहरातील वाहतुकीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. वेदशाळेच्या समोरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधितांशी चर्चा करून चार दिवसात दुरूस्तीचे काम करण्यात येईल. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे, यावेळी सांगण्यात आले.

ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.