Pune crime | भोर हादरले 3 दिवसात आढळले 4 मृतदेह, 2 महिला, 2 पुरुषाचा समावेश
पुण्यातील भोर तालुक्यात सलग तीन दिवसात 4 ठिकाणी मृतदेह आढळून आलेत, यात 2 महिला आणि 2 पुरुष मृतदेहांचा समावेशय.दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना आढळून आलेत,तर एका पुरुषाचा मृतदेह भोर शहरालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलायं.
विनय जगताप, पुणे – भोर तालुक्यात (Bhor) 3 दिवसात चार मृतदेह (Death ) आढळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 महिला, 2 पुरुषाचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या घटना घातपात की आत्महत्या(Suicide) आहेत याचा तपास भोर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार 3 आत्महत्या असल्याचं प्राथमिक अंदाज आहे ,तर एकाचं कारण अद्याप अस्पष्ट,पोस्टमॉरटम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
नेमकं काय घडलं
पुण्यातील भोर तालुक्यात सलग तीन दिवसात 4 ठिकाणी मृतदेह आढळून आलेत, यात 2 महिला आणि 2 पुरुष मृतदेहांचा समावेशय.दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना आढळून आलेत,तर एका पुरुषाचा मृतदेह भोर शहरालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलायं. दुसऱ्या पुरुषाचा मृतदेह पुणे-महाड मार्गावरील 200 फूट खोल दरीत आढळून आलाय.यापैकी दोघांची ओळख पटलीयं, तर इतर दोघांची माहिती मिळवण्याचं कामं सुरूय.दरम्यान यात तिघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय . चौघंचाही पोस्टमॉरटम अवहाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणारेय.भोर पोलीस स्टेशनंचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. य या घटनांचीच सर्वत्र चर्चा आहे. या घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडल्या आहेत. तसेच त्या आत्महत्या आहेत की घातपात या चर्चांना उधाण आले आहे.
Nashik | गुजरातच्या थापाड्यांनी Rajasthan सरकारच्या नावाचा वापर करून घातला 7 कोटींचा गंडा
ठाण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला, ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याचा संताप