पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याची दोन एकर मका पाण्यात, अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे…
विशाल झगडे यांच्या शेतात गेल्या सहा दिवसांपासून पाणी साचल्याने शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा डाव्या कालव्यातून तालुक्यातील वडापुरी येथील तलावात पाणी सोडले जात आहे. तीन वर्षांपूर्वी येथील बंधारा फुटला होता.
इंदापूर : पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका इंदापूर (Indapur) तालुक्यातील शेतकऱ्याला बसलायं. इंदापूर तालुक्यातील झगडेवस्ती येथील शेतकरी विशाल झगडे यांच्या शेतातील दोन एकर मका पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे पाण्यात गेलायं. यामुळे विशाल यांच्या मक्याच्या पिकाचे मोठे नुकसान (Damage) झाले असून सहा दिवसांपासून शेतामध्ये पाणी साचल्याने मक्याचे पिक वाया जाण्याची वेळ आलीयं. यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडून घडलेल्या प्रकरणा विषयी विचारण्यात आल्यास अधिकाऱ्यांकडून (officers) उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे झगडेवस्ती येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा संताप व्यक्त केलायं.
पाटबंधारे विभागाचे नियोजन फिसकले आणि थेट शेतात पाणी शिरले
विशाल झगडे यांच्या शेतात गेल्या सहा दिवसांपासून पाणी साचल्याने शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा डाव्या कालव्यातून तालुक्यातील वडापुरी येथील तलावात पाणी सोडले जात आहे. तीन वर्षांपूर्वी येथील बंधारा फुटला होता. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तो बंधारा दुरुस्त करण्यात आला नाही. याच काळात लाखो रुपये खर्चून तलावात पाणी आणण्यासाठी वेगळ्या मार्गाने पाटाचे नियोजन केले होते.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे
तलावात पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने वेगळ्या मार्गाने पाटाचे नियोजन केले. मात्र, हे सर्व अयशस्वी झाले. यातून पाणी न आणता जुन्याच मार्गाने पाणी आणल्याने याचा मोठा तोटा शेतकऱ्याला बसला आणि सर्व पाणी विशाल झगडे यांच्या शेतात शिरले. शेतामध्ये दोन एकर मक्याचे पिक आता गेल्या सहा दिवसांपासून पाण्याखाली आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोयं.