काळजी घ्या ! पुण्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा 100 पार केलीय ; साथीच्या रोगाचे प्रमाणही वाढले

| Updated on: Nov 18, 2021 | 10:43 AM

शहरातील रुग्णसंख्येने आता शंभरीचा आकडा पार केला आहे. काल (17 नोव्हेंबरपर्यंत) रुग्णांची आकडेवारी 107 इतकी वाढली आहे. सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

काळजी घ्या ! पुण्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा 100 पार केलीय ; साथीच्या रोगाचे प्रमाणही वाढले
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली होती. दिवाळीत तर रुग्णसंख्या अगदी शून्यावर आली होती, मात्र दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील रुग्णसंख्येने आता शंभरीचा आकडा पार केला आहे. काल (17 नोव्हेंबरपर्यंत) रुग्णांची आकडेवारी 107 इतकी वाढली आहे. सातत्याने वाढत असलेली रुग्णसंख्या महापालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

आकडेवारी काय सांगते

  • महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या 843 इतकी आहे.
  •  काल दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • आजपर्यंत शहरात 9 हजार 88 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • शहरातील विविध रूग्णालयांमध्ये 100 गंभीर रूग्णांवर तर 67 रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
  • आज दिवसभरात 69 कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
  • शहरात आतापर्यंत36 लाख 29 हजार 558जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.
  • यातले 5लाख 5 हजार 619 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 4लाख 95 हजार 682जण कोरोनामुक्त झाले आहेत.

साथ रोगाचेही वाढतंय प्रमाण

दिवाळीपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे. इतकंच नव्हेतर ठिकठिकाणी अवकाळी पाऊसही पडत आहे. या सगळ्याच्या परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत दिसून आला आहे. हवामान बदल व पाऊस यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. सर्दी, खोकला ,ताप हे लक्षणे
असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच डेंग्यूचे रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. राजगुरूनगर येथे एकाच दिवशी शहरातमध्ये 11 रूग्ण आढळून आले आहेत.  बदलत्या हवामानात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

पुणे म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करताय? वाचा मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर

Waqf Board land scam case: पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार ED समोर हजर

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पोलीस भरती लेखी परीक्षा १९ नोव्हेंबरला, १९ हजार ०३१९ उमेदवार देणार परीक्षा