आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट, मोदींच्या हस्ते आज लोकार्पण

Narendra Modi Solapur Visit | सोलापुरात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे नगर फेडरेशनने हा प्रकल्प उभारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी यासाठी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी 15 हजार घरांचे लोकार्पण मोदी करणार आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प, 834 इमारती, 30 हजार फ्लॅट, मोदींच्या हस्ते आज लोकार्पण
narendra modi
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 7:35 AM

सागर सुरवसे, सोलापूर, दि.19 जानेवारी 2024 | सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा गृह प्रकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून रे नगर फेडरेशनने हा प्रकल्प उभारला आहे. 30 हजार घरांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 834 इमारती आहेत. 1 BHK चे 30 हजार फ्लॅट आहेत. 365 एकर मैदानात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातील 30 हजारांपैकी 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या घरांची मालकी महिलांच्या नावाने असणार आहे. १५ हजार घरांच्या चाव्यांचे वितरण यावेळी होणार आहे.  यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

काय काय आहे प्रकल्पात

गृह प्रकल्पात क्रीडांगण, स्किल स्किल डेव्हलपमेंट सेंटर, योगा सेंटर तसेच 24 अंगणवाडी आणि 6 प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या आहेत. 1 आरोग्य केंद्र, विजेचे उपकेंद्र उभारले आहे. त्यात 24 तास पाणी आणि वीज असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30 हजार घरांपैकी 15 हजार घरांचा चावी वाटप करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेसाठी 5 लाख स्क्वेअर फुटाचा मंडप उभारला आहे. 1 लाख कामगारांची सभा होणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून रे नगर येथील गृह प्रकल्प कार्यक्रमाचा पूर्वतयारीचा आढावा घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. पालकमंत्र्यांच्या हस्ते रेनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. रे नगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसिया अडम यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबरोबर सोलापुरातून रोड शो करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.