31 वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार, तुमच्या शहराचा आहे का समावेश वाचा

| Updated on: Apr 13, 2023 | 2:46 PM

देशभरात नव्या युगाची ट्रेन मानली जाणारे वंदे भारत एक्स्प्रेसची व्याप्ती वाढणार आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आलेली ही ट्रेन अनेक शहरांमधून धावणार आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 75 ट्रेन सुरु होणार आहे. त्यातील 31 लवकरच सुरु होणार आहे.

31 वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार, तुमच्या शहराचा आहे का समावेश वाचा
Follow us on

पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे. सध्या 14 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. ऑगस्ट 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्यातील 31 वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. ज्या शहरांमधून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे, त्यात पुणे आणि मुंबईचाही समावेश आहे.

मुंबई-पुणे शहरातून ट्रेन


देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत ट्रेन वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली होती. आता मुंबई ते मडगाव, जबलपूर ते इंदूर, हावडा ते पुरी, सिकंदराबाद ते पुणे, तिरुवनंतपुरम ते मंगलुरु, चेन्नई एग्मोर ते कन्याकुमारी, मंगलुरु ते म्हैसूर, इंदौर ते जयपूर ट्रेन लवकरच सुरु होणार आहे.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणी ट्रेन


विजयवाडा ते चेन्नई सेंट्रल, जयपूर ते आग्रा, नवी दिल्ली ते कोटा, नवी दिल्ली ते बीकानेर, मुंबई ते उदयपूर, हावडा जंक्शन ते बोकारो स्टील सिटी, हावडा जंक्शन ते जमशेदपूर, हावडा जंक्शन ते पटना, हावडा जंक्शन ते वाराणसी, विशाखापट्टनम ते शालीमार, भुवनेश्वर ते विशाखापट्टनम, तिरुपती ते विशाखापट्टनम, नरसापूरम ते विशाखापट्टनम, नरसापूरम ते गुंटूर, बेंगलुरु ते धारवाड, बेंगलुरु ते विजयवाडा, बेंगलुरु ते कुरनूल, बेंगलुरु ते कोयंबटूर, एर्नाकुलम जंक्शन ते चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर ते मदुरई जंक्शन, चेन्नई सेंट्रल ते सिकंदराबाद आणि बेंगलुरु ते कन्याकुमारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.

1128 प्रवासी क्षमता 

या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात. तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे.  एकूण 1128  इतकी प्रवासी क्षमताआहे.

हे ही वाचा

Ratan Tata House Photos : रतन टाटा यांचे घर पहिले का? काय आहेत सुविधा जाणून घ्या?

 

दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट