‘आमचा स्वाभिमान आमचे विमान’, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?

इंदापूरच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. या जागेवरुन महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे. कारण या जागेवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा दावा आहे. पण इथे अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि राष्ट्रवादीत इंदापूरच्या जागेवर कुस्ती होते का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्याआधी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अपक्ष लढण्याचे संकेत देण्यात येत आहेत का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चा रंगण्यामागील कारणही तसंच आहे. कारण इंदापुरात विमानाचा फोटो असलेला बॅनर झळकवण्यात आला आहे.

'आमचा स्वाभिमान आमचे विमान', इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 8:58 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतर महायुतीच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे बोट दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तरही देण्यात आलं. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी ही युती तशीच अबाधित राहते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याचं वातावरण पाहता राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे तीन घटक पक्ष एकत्र राहू शकतात. पण भाजपचे इंदापुरातील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न निर्माण होण्यामागील किंवा अशी चर्चा सुरु होण्यास इंदापुरातील एक बॅनर कारणीभूत ठरलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कारण या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आलेल्या गोष्टी पाहता इथे आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या घटना घडू शकतात, याचे संकेत मिळताना दिसत आहेत. इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, विधानसभा 2024 असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?

या बॅनरमधला आशय आणि विमानाचं चिन्ह इंदापूरच्या राजकारणात खास आहे. कारण गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत बघायला मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला होता. त्याआधी दोन वेळा हर्षवर्धन पाटील हे विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आता अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा आता रंगत आहे.

इंदापूरच्या जागेवर सध्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. या जागेवर हर्षवर्धन पाटील यांचादेखील दावा आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बॅनरबाजी केली का? असादेखील प्रश्न आता उपस्थित होतोय. संबंधित बॅनर झळकल्यानंतर आता इंदापुरात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.