अजित पवार यांच्या फॉर्म हाऊस बाहेर सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक, बारामतीत खळबळ

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या फॉर्म हाऊसच्या बाहेर हे बॅनर लावण्यात आलं होतं.

अजित पवार यांच्या फॉर्म हाऊस बाहेर सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक, बारामतीत खळबळ
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 4:11 PM

प्रदीप कापसे, Tv9 प्रतिनिधी, बारामती | 11 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रकार हा बारामती तालुक्यात घडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आगामी बारामी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असतील अशी चर्चा वारंवार सुरु असते. बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. असं असताना अचानक बारामती तालुक्यात सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित घटना ही काल रात्री घडली. अजित पवार यांचं कऱ्हाटी गावात फार्म हाऊस आहे. याच फार्म हाऊसच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचं बॅनर लावलं होतं. पण अंधाराचा फायदा घेऊन या बॅनरवर शाईफेक करण्यात आली. अज्ञात आरोपी शाईफेक करुन पळून गेले आहेत. या शाईफेकच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही शाईफेक नेमकी कुणी केली? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहेत. तसेच त्यांनी विषयाचं गांभीर्य ओळखून तातडीने महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

पोलिसांनी संबंधित बॅनर काढला

पोलिसांनी संबंधित घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी तऱ्हाटी गावातून संबंधित बॅनर काढला आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही नेत्याचं बॅनर असलं तरी त्यावर शाईफेक करणं हे दुर्देवी आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी व्हायला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. बारामती पोलिसांकडून या सविस्तर प्रकरणाचा तपास सुरु आहे. शाईफेक नेमकी कुणी केली? याचा तपास केला जातोय.

'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.