AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; SSPU आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार

पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कौशल्य विकासाच्या महत्त्वावर भर देण्यात आला. डॉ. नीलम गोर्हे यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी कौशल्य विकासाची गरज अधोरेखित केली. सोनम वांगचुक यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणि AI च्या भूमिकेवर प्रकाश टाकला. सिम्बायोसिसने युनेस्कोसोबत करार करून नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धती विकसित करण्याचा निर्णय घेतला. परिषदेत भारताच्या भविष्यातील कौशल्य गरजा आणि महिला सक्षमीकरणावर चर्चा झाली.

स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; SSPU आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार
Skill development, IndiaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2025 | 7:02 PM

पुणे २५ एप्रिल : “शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबविल्या जाणार्‍या योजनेतून समाजाला चांगले फलित मिळतात. त्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात.” असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलमेंट अँड टीव्हीईटी (तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण) या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी अध्यक्षस्थानी सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार हे होते. तसेच युनेस्को युनिवोकचे फेडरिक युब्लर, लडाख येथील एचआयएचे संस्थापक संचालक सोनम वांगचुक, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंग व सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार हे उपस्थित होते.

जागतिक शिक्षणाचे आदान प्रदान करणे, नाविण्यपूर्ण शिक्षणाची पद्धती व क्षमता निर्माण करण्यासाठी एसएसपीयू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पहलगाममधील दुखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली.

डॉ.निलम गोर्‍हे म्हणाल्या,” महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यातील कौशल्या गुणांना अधिक वाव दयावा. त्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देने काळाची गरज आहे. समाजात त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. तसेच शाश्वत विकासासाठी ग्रामिण क्षेत्रातील पर्यावरण, जल आणि आरोग्यासाठी कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे.”

सोनम वांगचुक म्हणाले,” शिक्षण क्षेत्रातील एआय व इंटरनेट गोष्टीने संपूर्ण जग बदलल आहेे. जुन्या काळात शिकण्याची पद्धत ही सर्वोत्तम असल्याने बुद्धीमत्तला अधिक जोर दयावा लागत असे. जीवनात प्रात्यक्षित शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण महत्वाचे आहे. हे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाते. इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅन पॉवरची गरज आहे. नवी शिक्षण पद्धती खूप चांगली असली तरी त्याचे प्रात्यक्षात उतरणे महत्वाचे आहे. विद्यापीठ हे केवळ माहितीचे स्त्रोत राहिले आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षण पद्धतीत बदल घडावे. अत्याधुनिक काळात शिक्षकांनी स्वतःची भूमिका बदलने गरजेचे आहे. भविष्यात ब्राइट हेड, स्किल हॅन्ड आणि हार्ट या तीन गोष्टी सर्वात महत्वाचे असतील. प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ हे कौशल्यपूर्ण असावे.”

डॉ.शां.ब. मुजुमदार म्हणाले,” युवकांच्या या देशात त्यांच्या कौशल्य गुणांना वाव देऊन त्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे येथे युवकांना रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही तर रोजगार त्यांच्याकडे येईल. वर्तमानकाळात इंडस्ट्री आणि विद्यापीठामध्ये योग्य समन्वय साधून त्याचा उपयोग केला पाहिजे. देश प्रगतीसाठी महिला सशक्तीकरण सर्वात महत्वाचे आहे.”

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या,” विकसित भारत बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्किल इंडिया व मेक इंन इंडियाच्या धर्तीवर विद्यापीठाने पाऊले उचलीत आहेत. विकसीत भारतासाठी या विद्यापीठाचे खूप मोठे योगदान आहे. सक्षम महिला सक्षम समाज यानुसार महिलांच्या विकासावर भर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या ५ वर्षात हजारो महिलांना भविष्यातील कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. आधुनिक काळात इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य कर्मचारी देण्यावर अधिक भर देऊन प्रशिक्षित करण्याचे कार्य केले जाते. राष्ट्र उभारणीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्या दिशेने त्यांच्यासाठी हे विद्यापीठ कार्य करीत आहे.”

युनेस्को नवी दिल्ली प्रादेशिक कार्यालय दक्षिण आशिया चे संचालक टिम कर्टिस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देतांना सांगितले,” संपूर्ण जगात युवकांची संख्या अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या उद्भवणार आहे. तसेच महिला सशक्तीकरणाबरोबरच त्यांच्या कौशल्य विकासावर अधिक भर दयावा. आधुनिक काळात एआय आणि शाश्वत विकासाची भूमिका महत्वाची असेल.”

खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.