Video : Raj Thackeray on Rana | मातोश्री बंगला काय मशिद आहे का? राज ठाकरेंच्या निशाण्यावर नवनीत राणाही, मधू इथं अन् चंद्र तिथे!
राज ठाकरे म्हणाले, माझ्यावरील टीका सहन करेल. पण पोरं नाही अडकवू देणार. आता जाग आली. राज ठाकरेंनी माफी मागावी. बारा वर्षानंतर जाग आली. तेव्हा कुठे होती ही माणसं. एक सांगतो. यातून चुकीचे पायंडे पडतात हे लक्षात ठेवा.
![Video : Raj Thackeray on Rana | मातोश्री बंगला काय मशिद आहे का? राज ठाकरेंच्या निशाण्यावर नवनीत राणाही, मधू इथं अन् चंद्र तिथे! Video : Raj Thackeray on Rana | मातोश्री बंगला काय मशिद आहे का? राज ठाकरेंच्या निशाण्यावर नवनीत राणाही, मधू इथं अन् चंद्र तिथे!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/22173522/raj-thakre-n.jpg?w=1280)
पुणे : मनसे अध्यश्र राज ठाकरे यांनी पुण्यात सभा आहे. या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, लाऊडस्पीकरचा मुद्दा काढला. तेव्हा काहींना हे हिंदूत्व झोंबलं लाऊडस्पीकर (loudspeaker) झोंबले. आपल्या विरोधात सर्व एकत्र येतात. नाहीतर भांडत असतात. साधी गोष्ट आहे. राणा दाम्पत्य. मी काही सांगितलं मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा. मी सांगितलं. राणा दाम्पत्य समोर आलं. त्यांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याचा हट्ट केला. मातोश्री काय मशिद आहे का. त्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे (Madhu here and Chandra there). त्यानंतर एकत्रं आले. सोडण्यात आलं. सेनेकडून वाट्टेल ते बोलण्यात आलं. तेही बोलले. एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि राऊत जेवताना दिसले. शिवसेनेतील पदाधिकारी लोकांना काही वाटतच नाही. जे लोक मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आलाय. तिकडे त्यांच्यसोबत जेवताय, फिरताय हे सर्व ढोंगी आहे. यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच आहे, असी टीका राज ठाकरे यांनी केली.
पाहा व्हिडीओ
पोर अडकू देणार नाही
राज ठाकरे म्हणाले, माझ्यावरील टीका सहन करेल. पण पोरं नाही अडकवू देणार. आता जाग आली. राज ठाकरेंनी माफी मागावी. बारा वर्षानंतर जाग आली. तेव्हा कुठे होती ही माणसं. एक सांगतो. यातून चुकीचे पायंडे पडतात हे लक्षात ठेवा. विषय माफी मागण्याचा आहे ना. गुजरातला अल्पेश ठाकूर आहे. एका मुलीवर बलात्कार झाला. उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मारलं. 10 ते 15 हजार लोकांना गुजरातमधून हाकलून दिलं. ते मुंबईत आले. ते पुन्हा गुजरातला गेले. तिथून कोण माफी मागणार आहे. तिथून कुणाला माफी मागायला लावणार. तुम्हीही राजकारण समजून घ्या, असंही त्यांनी सांगितलं.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/22172305/raj-thackeray-3-2.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/themes/tv9marathi/images/tv9-marathi-placeholder.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/22170519/raj-thackeray-1-15.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/22163549/Sanjay-Raut-87-1.jpg)
केसेस टाकल्या असत्या
मी अयोद्धेला हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असतं. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.