कोविड-19 च्या डेल्टा व ओमिक्रॉनमधील फरक ओळखणे आता सहज शक्य; भारतीय बनावटीचा चाचणी संच विकसित
जीनपॅथ डायग्नोस्टिक्सने तयार केलेला चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेमध्ये विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची मान्यता देखील त्याला मिळाली आहे.
पुणे- पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड-19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे.
नेमका उद्देश…. या संशोधनाद्वारे कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा नेमका प्रकार ओळखणे सोपे झाले आहे. या प्रकारच्या अचूक व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत चाचण्या उपलब्ध करण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगत जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचा उद्देश आहे.“या चाचणीसंचाच्या मदतीने जगभरात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोविड-19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन सोबतच या विषाणूच्या इतर प्रकारांची ओळख पटविणे शक्य झाले आहे.
ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील फरक ओळखणे शक्य
जीनपॅथ डायग्नोस्टिक्सने तयार केलेला चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेमध्ये विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची मान्यता देखील त्याला मिळाली आहे. या चाचणीसंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारातील बीए 1 व बीए 2 सोबत नवीन येत असलेला बीए 3 आणि ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील ठळक फरक ओळखता येतो.
Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?
पीएफ संदर्भात महत्वाचा अलर्ट, डेडलाईन संपली तर होऊ शकते नुकसान, आळस झटका आणि वारसाचं नाव जोडा