पुण्यात सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा
Supriya sule: पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.
पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना जोरदार घोषणाबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’च्या दिल्या. तसेच ‘देवेंद्र फडणवीस आगे बढो’ अशा प्रकारचे देण्यात घोषणा दिल्या. शेवटी चंद्रकांत पाटील यांननी उभे राहून कार्यकर्त्यांना शांत करावा लागले.
सुप्रिया सुळेंकडून गडकरींचे कौतूक
घोषणेबाजीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला आलो आहोत. त्यांच्याबरोबर बरेच वर्षे संसदेत काम करायची संधी मिळाली. सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत. त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही. ते काम बघतात. माझ्या मातदार संघात जी रस्त्याची कामे सुरु आहेत, ती चांगल्या दर्जाची होत आहे. गडकरी साहेबांनी माझ्या मतदार संघासाठी सर्वात महत्वाचे काम केले आहे. वारजेमध्ये होणारे अपघात कमी झाले आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करावी
राष्ट्रीय महामार्गाची संपूर्ण टीम आणि सेव लाइव्हसची संपूर्ण टीम नऱ्हेमध्ये असते. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत एक ही अपघात झाला नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातील अपघात शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीच गडकरी साहेबांचे मार्गदर्शन घेत असतो. मी गडकरी साहेबांना विनंती करते, पुण्याची वाहतूक कोंडी जरी हा तुमचा विषय नसला तरीही तुमचे योगदान पुण्याचा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्वाचे असणार आहे.
पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.