‘एकाच फोनवरून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास शक्य’, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनोख्या ॲपचं उद्घाटन

कोव्हिडमुळे येत्या वर्षीही शिक्षण ऑनलाईन राहील असं दिसत असताना, जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

'एकाच फोनवरून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास शक्य', जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनोख्या ॲपचं उद्घाटन
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:24 AM

पुणे : कोव्हिडमुळे येत्या वर्षीही शिक्षण ऑनलाईन राहील असं दिसत असताना, जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, प्रसिद्ध सिनेअभिनेते ललित प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका दीपा देशमुख, अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, नाशिक शिक्षण विभाग उपसंचालक उपासनी उपस्थित होते (Jalgaon collector launch online education App V School by VOPA).

“एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकणार”

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इंटरनेटपासून ते अगदी अभ्यासासाठी वेळेत फोन मिळेपर्यंत अनेक गोष्टी यामध्ये असतात. या साऱ्याचा विचार करून ‘वोपा’ने ‘व्ही-स्कूल’ या ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये मल्टीमिडीया पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध केला गेलाय. अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग शक्य आहे. तसेच, यात एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील. यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि प्रशासन सहकार्य करणार आहेत.

ॲपमधील अभ्यासक्रम निर्मितीसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जळगाव जिल्हा या शैक्षणिक ॲपमध्ये संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. यानिमित्ताने उर्दू भाषेतील शैक्षणिक साहित्य ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येईल, असेही राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

शिक्षणातील अडथळ्यांवर ‘साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या’ मुलांकडून मात

शैक्षणिक क्षेत्रातल्या अडचणींवर आजचे तरूण अगदी ‘साने गुरुजींची धडपडणारी’ मुलं असल्याप्रमाणे मात करत आहेत, असं प्रसिध्द लेखिका दीपा देशमुख यांनी आपल्या मनोगतात मांडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ॲपची खूप मदत होणार असल्याचे सांगून ॲपच्या विविध बाबींविषयी सविस्तर माहितीही त्यांनी आपल्या भाषणातून दिली.

“तंत्रज्ञान किंवा पैशाच्या अभावाने शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांपर्यंत ॲप पोहचवा”

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांनी किमान दिवसातला 1 तास काढा आणि ‘व्ही-स्कूल’ ॲपसाठी अभ्यासक्रम तयार करा, जास्तीत जास्त शिक्षकांना यासाठी जोडून घ्या, थोडी का होईना मदत करा, असे आवाहन अभिनेता ललित प्रभाकरने महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांना केले. ज्यांना शिक्षणाची गरज आहे, पण त्यांच्यापर्यंत, तंत्रज्ञान किंवा पैशाच्या अभावाने शिक्षण पोहचू शकत नाही अशांपर्यंत या ॲपची माहिती पोहचवा, असेही त्यानं सांगितलं.

लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गेल्या वर्षभरात सव्वा कोटी पेज व्ह्यूज

अभिनेते पुष्कराज चिरपुटकरनेही या प्रकल्पाला अधिकाधिक मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. ‘वोपा’चे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी ॲपची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये सांगितली. अजहरन नदाफ यांनी शिक्षणविषयक गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली, तर ओंकार तोटे या विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणात या ॲपमुळे खूप मदत होईल असे सांगितले. ‘वोपा’च्या संचालिका ऋतुजा जेवे यांनी सूत्रसंचालन केले. ‘वोपा’ने गेल्या शैक्षणिक वर्षात वेबसाईटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले असून, गेल्या वर्षभरात सव्वा कोटी पेज व्ह्यूजसह ही वेबसाईट महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी वापरली आहे आणि आता मोफत ॲपच्या माध्यमातून ‘वोपा’ व जळगाव जिल्हा परिषद तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत.

हे ॲप कसं डाऊनलोड करणार?

वोपा संस्थेच्या http://edu.vopa.in/learn/ या वेबसाईटला भेट देऊन हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे.

ॲपची वैशिष्ट्ये

  • पीडीएफ, ऑडिओ, पीपीटी, इमेजेस, जीआयएफ इमेजेस, व्हिडीओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर करून शिक्षण
  • कमी इंटरनेटमध्ये ऑनलाइन अभ्यास शक्य
  • अभ्यासाचे ऑफलाईन डाऊनलोडिंग करता येते
  • एका ऍपवरून 4 विविध इयत्तांचे विद्यार्थी अभ्यास करू शकतात.
  • विद्यार्थ्यांनी किती वेळ अभ्यास केला, याची नोंद होते.
  • कोणत्याही जाहिराती नाहीत.
  • आकर्षक व विचार करून डिझाईन केलेली रंगसंगती
  • अभ्यास एकाच ठिकाणी सेव्ह राहतो, व हरवत नाही.

ॲप कसं वापरावं?

1. edu.vopa.in येथील लिंकवरून ॲप डाऊनलोड करता येईल.

2. विद्यार्थ्यांना फोन नंबर टाकल्यावर त्यांना ओटीपी मिळेल.

3. विद्यार्थ्यांना आपली माहिती भरून प्रोफाइल तयार करता येईल व त्यानंतर आपल्या इयत्तेचा अभ्यास सुरू करता येईल.

4. दरवेळी लॉग इन करण्याची, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा :

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ

शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार, विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स करावा लागणार, ब्रीज कोर्स कसा असणार?

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी, पहिल्या ‘पाच’ मध्ये या राज्यांचा समावेश

व्हिडीओ पाहा :

Jalgaon collector launch online education App V School by VOPA

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.