माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं; कोविड सेंटरची व्यवस्था पाहून जयंत पाटील भावूक
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर उभारून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. (jayant patil praised Nilesh Lanke Foundation COVID Centre in Ahmednagar)
पारनेर: राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर उभारून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी या कोविड सेंटरची पाहणी करून लंके यांचं कौतुक केलं. तर, या कोविड सेंटरमधील व्यवस्था पाहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले. (jayant patil praised Nilesh Lanke Foundation COVID Centre in Ahmednagar)
पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली. आमदार लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात, असे सांगतानाच जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पवारसाहेब सामान्यांसाठी धावून जातात. त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत, अशा शब्दात पाटील यांनी लंके यांचं कौतुक केले आहे.
लंकेही भावूक
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान लंके यांनी पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. आमदार लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने लंकेही भावूक झाले होते.
लंके यांच्या पाठिवर कौतुकाची थाप
काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो. मात्र आज कोविड सेंटर पाहिल्याने लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा ‘पण’ त्यांनी घेतला आहे. 14 एप्रिलपासून झोकून काम करत आहेत. लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा लंके यांच्या माध्यमातून होत आहे, असं म्हणत पाटील यांनी लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
श्वेता महालेंकडूनही कौतुक
काही दिवसांपूर्वीच भाजपच्या आमदार श्वेता महाले या सुद्धा पारनेरला आल्या होत्या. त्यांनी या कोविड सेंटरची पाहणी केली होती. “आमदार निलेश लंके हे विधानसभेतील आमचे चांगले सहकारी आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही ते गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यात आदर्श काम करत आहेत,” अशा शब्दात श्वेता महाले यांनी लंके यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. भाजपच्या आमदार असतानाही सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदाराचं कौतुक महालेंनी केल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं होतं. (jayant patil praised Nilesh Lanke Foundation COVID Centre in Ahmednagar)
काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा श्री जयंत पाटील साहेबांनी भाळवणी येथील मा शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराला भेट दिली.तेथील उपलब्ध सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले आणि कौतुकाची थाप दिली.@Jayant_R_Patil pic.twitter.com/2ZlvUFmyDK
— MLA NILESH LANKE (@LankeMla) May 23, 2021
संबंधित बातम्या:
निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंकडून कौतुक
मुलींना नग्न करुन व्हिडीओ काढतात, रक्षकच भक्षक कसे बनले, श्वेता महाले कडाडल्या
VIDEO | निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…
(jayant patil praised Nilesh Lanke Foundation COVID Centre in Ahmednagar)