Video : जयंत पाटील म्हणतात ‘मी पुन्हा येईन’, सुप्रिया सुळे म्हणतात तसं म्हणू नका नायतर…
इंदापूरच्या सभेत बोलताना, जयंत पाटलांनी 'मी पुन्हा येईन' असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पुन्हा येईन म्हणू नका कारण तसं म्हणणारा पुन्हा येत नाही...त्यामुळे मी पुन्हा नक्कीच येईन असे म्हणा..."
इंदापूर : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणातला तापमानाचा पारा वाढलाय. असातच जयंत पाटलांनी (Jayant Patil) इंदापूरच्या सभेत बोललेलं एक वाक्य व्हायरल होतंय. नवाब मलिक यांना ईडीने दुपारी अटक केल्यानंतर त्यांना आठ दिवसांची कोठडी मिळाली आहे. इकडे मुंबईत मलिकांमुळे पवारांनी बैठकांचा सपाटा लावलाय. तर दुसरीकडे जयंत पाटील आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज जयंत पाटलांची इदापुरात सभा होती. या सभेवेळी जयंत पाटालंची जे उद्गागार काढले ते ऐकून काही वेळ कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. विधानसभेच्या निवडणुकीआधी आणि त्यांच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) एक वाक्य प्रचंड गाजलं होतं. ते म्हणजे मी पुन्हा येईन. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्याची खिल्ली उडवली जाऊ लागली.
‘मी पुन्हा येईन’चा पुन्हा बोलबाला
इंदापूरच्या सभेत बोलताना, जयंत पाटलांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुन्हा येईन म्हणू नका कारण तसं म्हणणारा पुन्हा येत नाही…त्यामुळे मी पुन्हा नक्कीच येईन असे म्हणा…” त्यावर हजरजबाबी जयंत पाटील म्हणाले, ” माणसा माणसात फरक असतो” त्यानंतर पुन्हा हशा पिकला, जयंत पाटलांनी असे म्हणातच कार्यकर्त्यांनी नुसता धुरळा उडवला. जयंत पाटील त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. जयंत पाटील अनेकदा विरोधकांना थेट आव्हान देत टप्प्यात आला की कार्यक्रम होणारच असेही आव्हान देतात. आता जयंत पाटलांचं हेही वाक्य गाजत राहणार एवढं मात्र नक्की.
टप्प्यात कार्यक्रम हेही प्रचंड गाजलं
एका मुलाखतीत बोलताना, जयंत पाटील म्हणाले होते. आपलं शातं असतं. समोर कोणी काही बोललं की लगेच धाड धाड बोलायला जायचं नसतं. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच, हे जयंत पाटलांचं वाक्य त्या मुलाखतीनंतर आजपर्यंत गाजत आहे. जयंत पाटलांनी विधानसभेतील भाषण विरोधकांनाही खळखलून हसवणारी असतात. आता जयंत पाटली हे देवेंद्र फडणवीसांना डिवचण्यासाठी बोलले की भाजपला चॅलेंज म्हणून बोलले हे जरी सांगणे कठीण असले तरी. हा डायलॉग आता पुन्हा आणखी फेमस होणार एवढं मात्र नक्की, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर मलिकांच्या अटकेनंतर तोफा डागत आहेत. मलिकांचा राजीनामा घ्या अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा भाजपने दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही मलिकांच्या अटकेनंतर चिंता वाढली आहे. मात्र अशात हा जयंत पाटलांचा मिस्कील डायलॉग काही काळ तर हसू पिकवून गेला.