पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका?, जयंत पाटील अ‍ॅलर्ट; तयारीचा घेतला आढावा

यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील अ‍ॅलर्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. (jayant patil takes review meeting for western maharashtra flood situation)

पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका?, जयंत पाटील अ‍ॅलर्ट; तयारीचा घेतला आढावा
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 11:33 AM

पुणे: यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील अ‍ॅलर्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली, याची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली. (jayant patil takes review meeting for western maharashtra flood situation)

पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली तसेच संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यंत्रणा अ‍ॅलर्ट

2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला होता. त्यावेळी जयंत पाटील लोकांच्या मदतीला स्वतः उतरले होते. पाटील यांना स्वतः अनेक अडचणींचा त्यावेळी सामना करावा लागला होता. म्हणूनच या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता पाटील यांनी संपूर्ण यंत्रणा अगोदरच अ‍ॅलर्ट केली आहे. या बैठकीला कृष्णा खोरे कार्यकारी संचालक मुंडे, मुख्य अभियंता गुणाले, राजपूत, सांगलीचे अधिक्षक अभियंता नाईक, पुणे अधिक्षक अभियंता चोपडे, प्रविण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते. (jayant patil takes review meeting for western maharashtra flood situation)

संबंधित बातम्या:

VIDEO | तौक्ते चक्रीवादळाचा कहर, मुंबईत झाड कोसळताना महिला धावली आणि…

tauktae cyclone: कुठे घरांच्या छत कोसळल्या तर कुठे झाडे पडली; महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत दाणादाण

Cyclone Tauktae Tracker And Live Updates | समुद्रात 4 जहाजांवर 700 जण अडकले, 146 जणांना वाचवण्यात यश

(jayant patil takes review meeting for western maharashtra flood situation)

बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.