Hydrogen Fuel Cell Bus : पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचं पुण्यात अनावरण; वैशिष्ट्यपूर्ण बसची पाहा झलक…

हायड्रोजन इंधन सेल वाहने रस्त्यावरील कार्बन उत्सर्जन दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. लवकरच अशा बसेस रस्त्यावर धावतील, अशी अपेक्षा जितेंद्र सिंग व्यक्त केली.

Hydrogen Fuel Cell Bus : पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचं पुण्यात अनावरण; वैशिष्ट्यपूर्ण बसची पाहा झलक...
पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 11:36 AM

पुणे : पुण्यात देशातील पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे (Hydrogen Fuel Cell Bus) अनावरण करण्यात आले आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग (Jitendra Singh) यांनी नुकतेच या बसचे अनावरण केले. जगभरातील देशांमध्ये ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी काम सुरू आहे. पाश्चात्य देश पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करत आहेत. सध्या इलेक्ट्रिक वाहने या सर्वांना पर्याय बनत आहेत. परंतु भविष्यात यापेक्षाही चांगले तंत्रज्ञान आपल्यासमोर असेल आणि भारत त्यात क्रांती घडवू शकणार आहे ते हायड्रोजन आणि हवा वापरून धावणाऱ्या बसच्या वापराने. ही बस CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) आणि KPIT लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. त्यात या बसची झलकही दिसत आहे.

‘पर्यावरण-अनुकूल वाहतुकीचा एक पर्याय’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनने प्रेरित होऊन, KPIT CSIRने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित “हायड्रोजन फ्युएल सेल बस”चे अनावरण पुण्यात करण्यात आले.हा इंधन सेल हायड्रोजन आणि हवेचा वापर करून वीज निर्माण करतो आणि बसला उर्जा देतो, ज्यामुळे ती एक पर्यावरण-अनुकूल वाहतुकीचा एक पर्याय बनतो. डिझेल बसशी तुलना केल्यास, ती लांब पल्ल्याच्या मार्गांवर दरवर्षी 100 टन CO2 उत्सर्जित करते.

हे सुद्धा वाचा

‘क्रांतिकारी बदल घडवणार’

देशभरात लाखो डिझेल बस आहेत. याविषयी डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, की हायड्रोजन फ्युएल सेल ट्रकचा वापर खर्च डिझेल बसच्या तुलनेत कमी आहे. संपूर्ण देशात, विशेषतः मालवाहतुकीच्या क्षेत्रात हा पर्याय क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो. डॉ. जितेंद्र सिंग पुढे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘हायड्रोजन व्हिजन’चा उद्देश भारताला हवामान बदलाची उद्दिष्टे, स्वच्छ ऊर्जा तसेच स्वच्छ ऊर्जा पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी बनवणे आहे.

‘CO2 उत्सर्जन डिझेलवर चालणाऱ्या अवजड वाहनांमधून’

सुमारे 12-14 टक्के CO2 उत्सर्जन डिझेलवर चालणाऱ्या अवजड वाहनांमधून होते. हायड्रोजन इंधन सेल वाहने रस्त्यावरील कार्बन उत्सर्जन दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. लवकरच अशा बसेस रस्त्यावर धावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.