पुण्यातील तरुणांना नोकरीची संधी, ‘या’ कंपनीत डिजिटल एक्स्पर्टसची गरज

सध्या आम्ही डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. आगामी काळात क्वेस्ट कंपनीला पुण्यात डिजिटल हब उभारायचे आहे. | QuEST Global

पुण्यातील तरुणांना नोकरीची संधी, 'या' कंपनीत डिजिटल एक्स्पर्टसची गरज
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 6:36 PM

पुणे: क्वेस्ट ग्लोबल या इंजिनिअरिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून लवकरच डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्यात येणार आहे. कंपनीच्या पुण्यातील शाखेत ही भरती केली जाणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात 400 आणि पुढील तीन वर्षात 2000 डिजिटल एक्स्पर्टसची भरती करण्याचा कंपनीचा मानस आहे. (Engineering firm QuEST Global to hire 2000 digital experts in Pune)

कोरोनाच्या संकटामुळे सध्या भारतीय अर्थव्यवस्था आक्रसलेली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसांपूर्वीच क्वेस्ट कंपनीनेही अनेक वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ दिला होता. मात्र, आता कंपनीत नव्याने कर्मचाऱ्यांची भरती सुरु झाली आहे.

पुणे ही वैद्यकीय उपकरणे आणि वाहन उद्योगाची मोठी बाजारपेठ आहे. तसेच पुणे हे औद्योगिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. सध्या आम्ही डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. आगामी काळात क्वेस्ट कंपनीला पुण्यात डिजिटल हब उभारायचे आहे. आम्ही पुण्यातून आमच्या ग्राहकांना डिजिटल आणि हायकेट सुविधा परवू असे, क्वेस्ट कंपनीचे उपाध्यक्ष पियूष जैन यांनी सांगितले.पुण्यातील शाखेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवल्याने आम्हाल आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स या आधुनिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येईल, असेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

पुण्याच्या महाविद्यालयीन तरुणांना नोकरीची संधी मिळणार

क्वेस्ट कंपनी सध्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी बंगळुरू आणि तिरुवनंतपुमरमधील महाविद्यालयांच्या संपर्कात आहे. तसेच पुण्यातील काही महाविद्यालयातील तरुणांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात या तरुणांना कंपनीत इंटर्न म्हणून संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे काम योग्य वाटल्यास त्यांना सेवेत सामावून घेतले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब; अल्पावधीत बनले अब्जाधीश

कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर किती परिणाम?, खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

लग्नानंतर आर्थिक गणित कसं मॅनेज करायचं? ‘या’ सोप्या टिप्स लक्षात ठेवा

(Engineering firm QuEST Global to hire 2000 digital experts in Pune)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.