बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे सापडली लाखांची रोकड, काय आहे प्रकार?

| Updated on: Apr 08, 2023 | 10:34 AM

कोल्हापुरातील सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या वाहनांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रोकड मिळून आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस? पाडण्यासाठी ही रोकड जात होती. ही रक्कम बसमधील व्यक्तीकडे सापडली.

बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे सापडली लाखांची रोकड, काय आहे प्रकार?
Follow us on

भूषण पाटील, कोल्हापूर : देशात दर काही महिन्यांनी निवडणुकीचे वातावरण असते. मग कुठे निवडणूक असली की मतदार राज्यास संमोहीत करण्यासाठी अनेक बेकायदेशीर प्रकार केले जातात. त्यासाठी बेहिशोबी संपत्तीचा वापर केला जातो. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्याचा परिणाम कर्नाटकचा सीमा भाग असलेल्या कोल्हापूरमध्येही दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात 69.36 कोटी रुपये रोख, दारू आणि इतर साहित्य केवळ सात दिवसांत कर्नाटकात जप्त केल्याचे म्हटले होते. आता कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापुरात लाखोंची रोकड सापडली आहे.

सलग दोन दिवसांपासून रोकड


कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी रोकड मिळून आली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस? पाडण्यासाठी ही रोकड जात होती. कोगनोळी टोल नाक्यावर साडेसात लाखांची रोकड सापडली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे लाखांची रोकड सापडली आहे. गुरुवारी रात्री याच ठिकाणी दीड कोटीची रोकड जप्त केली होती. आता पुन्हा कोगनोळी टोल नाक्यावर साडेसात लाखांची रोकड पकडली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जातेय. त्यात ही रक्कम सापडली आहे. दोन दिवसांत कोट्यवधींची रक्कम महाराष्ट्रात जप्त झाली आहे.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात मोठी रक्कम जप्त


कर्नाटकात जप्त केलेल्या रकमेत 22.75 कोटी रुपये रोख आहेत. 24.45 कोटी रुपयांची दारु आहे. मतदारांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंची किंमत 12 कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या साहित्यात रोख रक्कम, दारू, भेटवस्तूंसोबत ड्रग्जसुद्धा आहे. एकूण 69 कोटी 36 लाख 17 हजार 467 रुपयांचा समावेश आहे.

526 एफआयआर

धारवाड मतदारसंघातून सुमारे 45 लाख रुपये किमतीचे 725 ग्रॅम सोने जप्त केले, तर फ्लाइंग स्क्वॉड टीमने बेंगळुरू शहरातील एका मतदारसंघातून 34 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोफत वस्तू जप्त केल्या. दुसरीकडे, 6 एप्रिल रोजीच बेलागावच्या खानापूर तालुका परिसरातून 4.61 कोटी रुपये रोख आणि 395 ग्रॅम सोने (21.25 कोटी) जप्त करण्यात आले आहे. जप्तीप्रकरणी आतापर्यंत एकूण 526 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

कधी आहे निवडणुका

कर्नाटक विधानसभेचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार येत्या 10 मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

दोन्ही पक्षात धुसफूस

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. तर सिद्धारमैया यांचाही मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. त्यामुळे ते शिवकुमार यांना या पदापासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत या दोन्ही नेत्यांमधील ठसन पाहायला मिळाली होती. दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर आपआपलं शक्तीप्रदर्शन केलं होतं. काँग्रेसमध्ये जशा अंतर्गत लाथाळ्या आहेत, तशीच धुसफूस भाजपमध्येही आहे. भाजपची सर्व मदार दुखावल्या गेलेल्या येडियुरप्पा यांच्यावर आहे. त्यामुळे येडियुरप्पा काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा

निवडणुकीपूर्वी आली कोट्यवधींची रोकड, मद्य अन् भेटवस्तू