कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील घडामोडींना वेग; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
या बैठकीत इच्छुकांची नाव घेण्यात आली आहेत. अजेंडा कसा असावा. पूर्वतयारी कशी करावी, या विषयावर चर्चा झाल्याचही प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
पुणे : कसबा विधानसभा (Kasba Assembly) पोटनिवडणुकीतील (By-Election) घडामोडींना आता वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आज महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. प्रशांत जगताप म्हणाले, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सात फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मागच्या निवडणुकीचा अपवाद सोडता राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहत होता. कसबा पोटनिवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपला पराभूत करू शकतो, असं कार्यकर्त्यांना वाटते.
कार्यकर्त्यांची मतं ही शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडं पाठविली जातील, असंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
त्यावेळी ही जागा काँग्रेसला दिली होती
१९९९ पासून आम्ही आघाडीत आहोत. १९९९, २००४, २०१४ याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार होता. २००९ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आग्रह केला. त्यावेळी ही जागा काँग्रेसला देण्यात आली होती. त्यामुळं रोहित टिळक यांच्यासाठी ती जागा सोडली होती.
निवडणूक जाहीर झाल्यापासून कोणत्याही पक्षाकडून हालचाल नाही. महापालिका पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
भाजपला मोकळे रान मिळू नये
भाजपला मोकळं रान मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. ही निवडणूक इतर पक्ष सिरीअसली घेणार नाहीत. त्यामुळं ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविण्याच्या तयारीत आहे.
या बैठकीत इच्छुकांची नाव घेण्यात आली आहेत. अजेंडा कसा असावा. पूर्वतयारी कशी करावी, या विषयावर चर्चा झाल्याचही प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल
राष्ट्रवादीच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही माहिती देऊ. त्यानंतर ते जो निर्णय घेतली तो आम्ही सर्वांना मान्य असेल, असंही प्रशांत जगताप यांनी म्हंटलं. महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाला ही जागा दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संबंधित महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करतील, असंही प्रशांत जगताप म्हणाले.
दहा इच्छुकांची नाव आली आहेत. त्यामध्ये रवींद्र माडकर, गणेशराव नलावडे, शिल्पा भोसले यांचा समावेश आहेत. इतर पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक येते जास्त होते. राष्ट्रवादीनं मतदानही जास्त घेतले आहे. प्रमुख राष्ट्रवादीची ताकद म्हणून हे शहर पाहत असल्याचंही प्रशांत जगताप यांनी सांगितलं.