काँग्रेसचं टेन्शन गेलं, पण अजित पवार यांचं टेन्शन काही कमी होईना, पाहा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

कसब्यात काँग्रेसचे बंडखोर शांत झालेत. पण चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं टेन्शन तूर्तास तरी कायम आहे. कारण राहुल कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नाही.

काँग्रेसचं टेन्शन गेलं, पण अजित पवार यांचं टेन्शन काही कमी होईना, पाहा Tv 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 11:42 PM

पुणे : कसब्यातून काँग्रेसला (Congress) मोठा दिलासा मिळाला. कारण बंडखोर बाळासाहेब दाभेकरांनी (Balasaheb Dabhekar) उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र चिंचवडमध्ये अजित पवारांचं (Ajit Pawar) टेन्शन कायम आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंच्या (Nana Kate) विरोधात अजूनही बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंनी (Rahul Kalate) अर्ज मागे घेतलेला नाही. पण कलाटे अर्ज मागे घेणार का? यावर प्रश्न विचारला असताना अजित पवार चांगलेच भडकले. 2019च्या निवडणुकीत राहुल कलाटेंना चिंचवडमध्ये उमेदवार न देता पुरस्कृत केलं होतं.

मात्र यावेळी राष्ट्रवादीनं आपला उमेदवार दिलाय. त्यामुळे भाजपच्या अश्विनी जगपातांबरोबरच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाना काटेंसमोर कलाटेंच्या बंडखोरीचंही आव्हान आहे. त्यामुळे राहुल कलाटेंना कोणाची फूस आहे? या प्रश्नावर मात्र अजित पवारांनी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलं.

राहुल कलाटे आधी शिवसेनेत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडूनही कलाटेंना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्वत: उद्धव ठाकरे कलाटेंशी बोलणार असल्याचं ठाकरे गटाचे सचिन अहीर म्हणालेत. मात्र माघार न घेण्यावर कलाटे ठाम आहेत. तर दुसरीकडे कसब्यात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुल धंगेकर आणि काँग्रेसलाही दिलासा मिळालाय.

हे सुद्धा वाचा

भाजपचा प्रचाराचा नारळ फुटला

इकडे भाजपनं कसब्यात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलीय आणि कसब्यासह चिंचवडमध्ये विजयाचा दावा केला. तर अजित पवारांनी भाजपच्या उमेदवाराशी काही संबंध असले तरी, नातं गोतं बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन मतदारांना केलंय.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे चिंचवडमधून राहुल कलाटे उमेदवारी अर्ज मागे घेणार का ?, हे कळेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.