जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन..

अमरावतीमध्ये पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

जातीय सलोखा राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन..
अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 1:32 PM

बारामती – त्रिपुरा येथील घटनेनंतर नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत जातीय दंगली उसळल्या.. काही समाजकंटकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.. काही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपण सर्वांनी आपली परंपरा कायम ठेवात, जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत एका कार्यक्रमावेळी बोलताना केलं आहे.

नेमक प्रकरण काय ? त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे देशभर याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रात देखील तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.  अमरावतीतील राजकमल चौक, नमुना गल्ली,ऑटो गल्ली, इतवारा परिसर, पठाण चौक, सरोज चौक, सराफा मार्केट, कपडा मार्केट आणि जव्हारद्वारा या परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. सद्यस्थितीला अमरावतीत तणावपूर्ण शांतात आहे.

अमरावतीमध्ये पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रं येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रं आलेले दिसल्यास त्यांना अटक केली जाणार आहे. इंटरनेटची सेवाही बंद करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालकांचे नागरिकांना शांततेचे आवाहन दरम्यान महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांच्याकडून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, या सर्व अफवा आहेत, नागरिकांनी अफवेंना बळी पडू नये. अशा घटनांमध्ये सहभागी लोकांचा फायदा होत नाही, उलट त्यांचे भविष्ट धोक्यात येते. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

गडचिरोलीमध्ये 26 नक्षलवादी ठार; वळसे पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक, पहा काय म्हणाले गृहमंत्री?

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन

Malegaon हिंसाचारातील 18 संशयितांना बेड्या, 41 जणांवर 5 गुन्हे दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.