VIDEO: पुणेकरांसाठी मोठी बातमी, खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर, पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं
मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे शहरातील चारही धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यातच खडकवासला धरण 100 टक्के भरत आल्यामुळे आज पहिल्यांदा खडकवासला धरणातून अडीच हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय.
पुणे : मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणे शहरातील चारही धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यातच खडकवासला धरण 100 टक्के भरत आल्यामुळे आज पहिल्यांदा खडकवासला धरणातून अडीच हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. शिवाय खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणे 50 टक्के भरली आहेत.
VIDEO: पुणेकरांसाठी मोठी बातमी, खडकवासला 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं#Pune #Rain #KhadakwaslaDam pic.twitter.com/GjykRtZE81
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 22, 2021
पुण्यात मुळशी तालुक्यात तोफगोळे फेकल्यासारखी पावसाने बॅटिंग केली. मुळशी तालुक्यात पावसाने चांगलीच धुलाई केली. या ठिकाणी दगडासारख्या गारा पडल्या. धरणक्षेत्रात झालेल्या पावसानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पावसाचा जोर असाच राहिला तर उद्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यात आहे.
खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी, लोकांना कोरोना नियमांचा विसर
दरम्यान, कोरोनाला थोपवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पर्यटनस्थळांवर कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र, सुट्टीच्या दिवशी पुण्यातील खडकवासला धरणावर पर्यटकांकडून गर्दी होताना दिसलीय. येथे लोकांची ये-जा सुरु असल्यानं आता या ठिकाणी शनिवार तसेच रविवारी पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केलीय. मात्र, पोलीस नसताना नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
हेही वाचा :
जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम
डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी
पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली
व्हिडीओ पाहा :
Khadakwasla Dam is near about to full of water after heavy rain in Pune