जावयास आमदार करण्यासाठी सासऱ्यांची फिल्डिंग, पण झाले असे की…

Khed Alandi Maharashtra Assembly Constituency: खेड आळंदी मतदार संघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप दत्तात्रय मोहिते निवडून आले होते. त्यांनी शिवसेना उमेदवार सुरेश नामदेव गोरे यांचा पराभव केला होता. दिलीप मोहिते यांना ९६८६६ तर गोरे यांना ६३६२४ मते मिळाली होती. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अतुल देशमुख यांनी निवडणुकीत रंगत आणली होती.

जावयास आमदार करण्यासाठी सासऱ्यांची फिल्डिंग, पण झाले असे की...
Atul Deshmukha
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 3:52 PM

Khed Alandi Maharashtra Assembly Constituency: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहचत आहे. राज्यातील सर्वच बड्या पक्षांचे उमेदवार जाहीर होऊ लागले आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी बड्या पक्षांकडे फिल्डींग लावली जात आहे. पुणे जिल्ह्यातील निवडणुकीकडे राज्यातील लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबियांमध्ये लढत होणार आहे. तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वर्चस्वाची लढाईसुद्धा होणार आहे. आता खेड आळंदी विधानसभा मतदार संघात दोन बड्या नेत्यांच्या जावयांना आमदार करण्यासाठी सासऱ्यांनी फिल्डिंग लावली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील नेते अतुल देशमुख यांनी केला.

खेड आळंदी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिडा कायम आहे. भोसरीचे आमदार विलास लांडेनी जावई सुधीर मुंगसे यांना आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली होती. त्यावरुन अतुल देशमुख यांनी विलास लांडे यांना थेट सुनावले आहे. ते म्हणाले, काळजी करु नका, खेड आळंदीचा निकाल अतुल देशमुखच ठरवणार आहे.

अतुल देशमुख शरद पवार गटातच राहणार

अतुल देशमुख यांनी आपण शरद पवार गटातच राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. भोसरीचे आमदार विलास लांडे, खेडचे नेते नानासाहेब टाकळकर यांना त्यांनी थेट आव्हान दिले आहे.

हे सुद्धा वाचा

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेने उद्धव ठाकरे गटाला सुटल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत बंडोखोरीची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल देशमुख यांनी शक्तीप्रदर्शन करत मेळावा घेतला. परंतु आपण पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी मेळाव्यात सांगितले.

२०१९ मध्ये असे झाले होते…

खेड आळंदी मतदार संघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप दत्तात्रय मोहिते निवडून आले होते. त्यांनी शिवसेना उमेदवार सुरेश नामदेव गोरे यांचा पराभव केला होता. दिलीप मोहिते यांना ९६८६६ तर गोरे यांना ६३६२४ मते मिळाली होती. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अतुल देशमुख यांनी निवडणुकीत रंगत आणली होती. त्यांनी ५३८७४ मते घेतली होती.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.