किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच

| Updated on: Nov 05, 2021 | 3:55 PM

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. (Kiran Gosavi has been sent to police custody till November 8 by a city court)

किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक
Follow us on

पुणे: मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. शिवाजी नगर कोर्टाने आज त्याच्या कोठडीत वाढ केल्याने किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली आठ दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोसावीने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता असल्याने न्यायालयाने गोसावीची अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात दाखल करण्यात आलेल्या 4 गुन्ह्यांसह राज्यातील इतर भागातही गोसावीवर 5 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याच्यासोबत आणखी काही जण असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला पोलीस कोठडी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती अॅड. किरण गोसावी यांनी दिली.

फसवणुकीचं प्रकरणं नेमकं काय?

किरण गोसावीवर पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली. तिला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसरीकडे, किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत झाली आहेत. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे.

गोसावीकडून दीड लाखाची मागणी

गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

गोसावी नेमका कोण?

गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.

 

संबंधित बातम्या:

शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही; राणेंची जोरदार बॅटिंग

उद्या भाऊबीज, पंकजाताईंकडून शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात, अजूनतरी नाही पण …

वड्याचं तेल वांग्यावर, वाद लोकलमधील प्रवाशांशी, हत्या फूटपाथवर झोपलेल्या दोघांची

(Kiran Gosavi has been sent to police custody till November 8 by a city court)