लग्नासाठी पोरगी मिळावी, शहरात समुद्र झालाच पाहिजे अन् मटन स्वस्त झाले पाहिजे, अशा मागण्या करणारी अनोखी रॅली

कोल्हापुरातील आंदोलनांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देखील दखल घेण्यास भाग पाडले आहे. लोकशाही पद्धतीने विविध आयुधे वापरत कोल्हापूरकर आंदोलन करत असतात. आता कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलन होतात, अशीच एक रॅली निघाली.

लग्नासाठी पोरगी मिळावी, शहरात समुद्र झालाच पाहिजे अन् मटन स्वस्त झाले पाहिजे, अशा मागण्या करणारी अनोखी रॅली
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 8:33 AM

भूषण पाटील, कोल्हापूर, दि. 6 फेब्रुवारी 2024 | कोल्हापूर शहर आंदोलनाचे शहर म्हणून ओळखले जाते. या कोल्हापूर शहरात अनेक मोठमोठे आंदोलने झाली आहेत. कोल्हापुरातील आंदोलनांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देखील दखल घेण्यास भाग पाडले आहेत. लोकशाही पद्धतीने विविध आयुधे वापरत कोल्हापूरकर आंदोलन करत असतात. आता कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलन होतात. ही आंदोलने देशभर गाजतात. आता कोल्हापुरात मंगळवारी एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली. या रॅलीतील मागण्यांनी कोल्हापूरकरांचे लक्ष वेधले होते. लग्नासाठी पोरगी मिळावी, शहरात समुद्र झालाच पाहिजे अन् मटन स्वस्त झाले पाहिजे, अशा मागण्या करणारी ही अनोखी सायकल रॅली होती. या रॅलीची चर्चा सुद्धा आता अख्ख्या कोल्हापुरात रंगली आहे.

माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन

कोल्हापुरातील सायकल रॅलीस खासबाग मैदान येथून सुरुवात झाली. पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत ही रॅली निघाली. या अनोख्या रॅलीची चर्चा कोल्हापुरात सुरू होती. कारण या रॅलीत वेगवेगळे फलक लावण्यात आले होते. त्यात लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच, मटन स्वस्त झालेच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे, अशा अनेक मजेदार मागण्या होत्या. मंगळवार पेठेतीली चिक्कू मंडळाकडून ही रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवातही अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या झाली होती.

काय होता रॅलीचा उद्देश

एकीकडे मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश काय होता? याची चर्चा कोल्हापूरकरांमध्ये रंगली होती. या रॅलीचा उद्देश आरोग्यासंदर्भात जागृतीचा होता. नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळले पाहिजे आणि आपलं आरोग्य सुद्धा जपले पाहिजे, हा उद्देश रॅलीचा होता.

हे सुद्धा वाचा

कोल्हापूर शहरातील खासबाग ते मिरजकर तिकटी, बिनखांभी गणेश मंदिर, महाद्वार रोड करत रॅली शिवाजी पुलावरून मुख्य मार्गावरून प्रयाग चिखलीपर्यंत रॅली पोहोचली. ही अनोखी सायकल रॅली पाहून अनेकांना कुतूहल वाटत होते. रॅलीत सर्वच वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.