कोयता गँगचा पोलिसांना आव्हान, रक्तबंबाळ होईपर्यंत पती-पत्नीवर कोयत्याने वार
पुणे पोलिसांनी कोयता गँगविरोधात मोठी कारवाई केली. अनेक जणांना अटक केली. आरोपींना मकोका लावला. त्यानंतरही पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. आता रस्त्यावर झोपलेल्या दाम्पत्यावर हल्ले करुन पोलिसांना आव्हान दिले आहे.
पुणे : Pune Crime News कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी मोठी (Crime News) कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्याला अटक केली. कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला. आरोपींकडून कोयते जप्त केली. त्यानंतरही गँगने डोके वर काढले आहे. पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. रस्त्यावर झोपलेल्या दाम्पत्यावर हल्ले करुन पोलिसांना आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी आता कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला आहेत. त्यात म्होरक्या समिर लियाकत पठाण याचा समावेश आहे. समिर लियाकत पठाण (वय-२६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर अल्पवयीन आरोपींचा समावेश होता. या कारवाईनंतर पुणे भाजपने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक करणारे पोस्टर भाजपच्या फेसबुक पेजवर दिले होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे पुणे शहरातील कोयता गँगवर मोठी कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला होता.
दावा फोल पुन्हा हल्ले
कायता गँगने पुणे शहरातील हल्ले थांबवले नाही. शिवाजीनगरजवळ मैदानावर झोपलेल्या सतीश भीमा काळे व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. त्यांच्यांवर कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत वार केले. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर यांनी हा हल्ला केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून हल्ला केला. आता पोलीस चौघ आरोपींचा शोध घेत आहे.
अजित पवारांनी विधासभेत मांडला मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.