कोयता गँगविरोधात पुणे पोलिसांचा असा पॅटर्न पहिला का? पाहा व्हिडिओ

समीर आणि शाहीद या गुंडांची कोंढव्यात चांगलीच दहशत होती. या भागातील व्यापारीही या गुंडांना घाबरून होते. यामुळे व्यापाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलिसांनी बॉलीवूड स्टाईल वापरली.

कोयता गँगविरोधात पुणे पोलिसांचा असा पॅटर्न  पहिला का? पाहा व्हिडिओ
पुणे कोयता गँग
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 3:47 PM

पुणे : Pune Crime News कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहे. या गँगचा म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला. आरोपींकडून कोयते जप्त केली. त्यानंतरही गँगने डोके वर काढात आहे. पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. रस्त्यावर झोपलेल्या दाम्पत्यावर हल्ले करुन पोलिसांना कोयता गँगने आव्हान दिले होते. यामुळे आरोपींना जबर बसवण्यासाठी पोलीस कठोर झाले आहे. पुणे शहरातील सर्वच भागात कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असल्याने पोलीसही हैराण झाले होते.

पुण्यातल्या कोंढवा परिसरातील हा व्हिडिओ आहे. समीर शेख आणि शाहिद शेख कोयता गँगमधील आरोपी. या आरोपींसोबत आणखी तीन ल्पवयीन मुलं आहे. तरुणाचा खुनाचा कट  यांनी आखला होता. पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.   आरोपींकडून कोयता, कुऱ्हाड, तलवार जप्त करण्यात आली. दहशत निर्माण करणाऱ्या या सराईत गुन्हेगारांसोबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. समीर आणि शाहीदची कोंढव्यात चांगलीच दहशत होती. या भागातील व्यापारीही या गुंडांना घाबरून होते. यामुळे व्यापाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलिसांनी बॉलीवूड स्टाईल वापरली. त्या गुंडांची धिंड काढली. रोज व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं.

कोयता गँगवर कारवाई भाजपचे फडणवीसांवर कौतूक : पुणे पोलिसांनी मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पोस्टरबाजी सुरु केली होती. भाजप नेते व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचे कौतुक करणारे पोस्टर केले होते. भाजप महाराष्ट्र या फेसबुक पेजवरुन ही पोस्ट शेअर केले होती.‘जनतेची सुरक्षा हीच शिंदे फडणवीस सरकारची हमी! असे पोस्टर होते. परंतु त्यानंतर पुण्यातील कोयता गँगची दहशत संपली नाही.

पोलिसांनी केला मकोकाचाही वापर : पोलिसांनी आता कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला होता. त्यात म्होरक्या समिर लियाकत पठाण याचा समावेश आहे. समिर लियाकत पठाण (वय-२६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत. त्यानंतरही कोयता गँग सक्रीय आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.