पुणे: चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणातील आरोपी केपी गोसावी याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. या तीन वर्षात गोसावी कुठे कुठे लपत होता याची क्रोनोलॉजीच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितली.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केपी गोसावीबाबतची माहिती दिली. गोसावीची एक तास कसून चौकशी केल्यानंतर तो कुठे कुठे लपला होता याची माहिती मिळाल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं. गोसावी हा पुणे, मुंबई, लोनावळा, जळगाव, उत्तर प्रदेशातील फत्तेपूर, लखनऊ, तेलंगनातील हैदराबाद आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लपून बसला होता. तो वारंवार लपून बसत होता. त्यामुळे त्याला ट्रेस करणं कठीण जात होतं. मात्र, तो ज्या ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या त्या ठिकाणी आमची टीम गेली होती. त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली होती, असं सांगतानाच आज पहाटे 3 वाजात कात्रजमधील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली, असं गुप्ता यांनी सांगितलं.
2018मधील फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी त्याच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. त्याला फरारही घोषित करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, असं सांगतानाच गोसावींने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर तक्रारदारांनी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
गोसावीने शरणागती पत्करली नाही. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला एकट्यालाच अटक करण्यात आली आहे. त्याने शरणागती पत्करण्याबाबत आमच्याशी संपर्क साधला नव्हता. मीडियासोबत त्याचं काय बोलणं झालं हे आम्हाला माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं. कोर्टाकडे त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. कोणत्या आधारावर आम्ही ही कोठडी मागू हे तुम्हाला कोर्टात गेल्यावरच कळेल, असंही त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत. चिन्मय देशमुखची फसवणूक झाली होती. त्यानंतर त्याला धमकावण्यात आलं होतं. त्यानंतर चिन्मयने तक्रार दाखल केली, अशी माहिती त्यांनी दिली. आमच्याशी मुंबई पोलीस किंवा कोणत्याही एजन्सीने संपर्क साधला नाही. त्याला सुपुर्द करण्याची कुणी विनंती केली तर आम्ही त्याला सुपुर्द करू. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 28 October 2021https://t.co/SzaKKuJOlA#MahafastNews100 #mahafast100newsbulletin #MaharashtraNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2021
संबंधित बातम्या:
अजित पवारांना पुन्हा धक्का, मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरावर ईडीची छापेमारी; चौकशी कशासाठी?
औरंगाबाद महापालिकेत असतील 126 नगरसेवक, प्रभागांची संख्या 42 वर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
(KP Gosavi nabbed from lodge at 3 am: Pune Police Commissioner Amitabh Gupta)