Savitribai Phule Statue| क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण, ठाकरे, फडणवीस एकाच मंचावर
विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मुख्य इमारतीच्या आवारात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला आहे. कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओत सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा बनवण्यत आला आहे.अतिशय भव्यदिव्या अश्या या पुतळ्याची उंची 12 फूट आहे.
पुणे – आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University Pune) साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Statue) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न झाला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या (Mahatma Phule Samata Parishad)पाठपुराव्यातून व मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार होते.मात्र कोरोनाचा प्रभाव अधिक वाढल्याने सदरचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
भव्य 12 फूट पुतळा विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मुख्य इमारतीच्या आवारात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला आहे. कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओत सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा बनवण्यत आला आहे.अतिशय भव्यदिव्या अश्या या पुतळ्याची उंची 12 फूट आहे. कार्यक्रमास गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळजी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी उपस्थित होते.
पुतळा कुठे बसावा यावरून होता संभ्रम
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठ त्यांचा पुतळा कुठं बसवायचा यावरून समितीमध्ये मतभेद होते . मात्र विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या परिसरातच हा पूर्णआकृती पुतळा बसवण्याचे निश्चित झाले. विद्यापीठात हा पुतळा नेमका कुठे बसवावा यासाठी अनेक जागा सुचवण्यात आल्या आहेत. परंतु सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपासच हा पुतळा असावा असे सुचवण्यात आल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी केली होती. सावित्रीबाई फुले यांचा विद्यापीठात पुतळा बसवत असताना दुसरीकडं शहरातील ज्या भिडेवाड्यात सावित्रबाईनी मुलींची पहिली शाळा घेतली तिथेही शाळा उभारण्यात येणार आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे महानगर पालिकेच्या वतीनेही शाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक जागेचे संपादनही ही केले जाणार आहे.
आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण
300 वर्षांची परंपरा, धानोरा महासिद्ध काठी महोत्सवाला सुरुवात