मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी, पुण्यात १० हजार बहिणी अपात्र, काय आहे कारण?

ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेत उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये आहे. तसेच लाभार्थींनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अटींचे पालन झाले की नाही, त्याची छाननी रखडली होती.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी, पुण्यात १० हजार बहिणी अपात्र, काय आहे कारण?
लाडकी बहीण योजना
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 12:48 PM

ladki bahin yojana: महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छननी केली जात आहे. या छननीत अनेक अर्ज अपात्र ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. त्यात विविध त्रुटींमुळे बहिणी अपात्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली. योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तसेच ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.

अपात्रांकडून पैसेही परत

लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी अपात्र ठरत आहेत. त्या अपात्र लाभार्थ्यांनी पैसे देखील परत केले आहेत. तसेच अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

या निकषांची पडताळणी

लाडकी बहीण योजनेत उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये आहे. तसेच लाभार्थींनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अटींचे पालन झाले की नाही, त्याची छाननी रखडली होती. विधानसभा निवडणुकीनंतर अपात्र लाभार्थ्यांवर राज्यभरात कारवाईसुद्धा सुरु झाली आहे. तसेच यापुढेही अर्जांची पडताळणी सुरुच राहणार असल्याचे महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. या योजनेमुळे महायुतीला मोठा कौल राज्यातील जनतेने दिला. भाजपने सर्वाधिक १३२ जागा मिळवल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. महायुतीला २३० जागा मिळाल्या. तसेच आता काही अपक्ष आमदारही महायुतीसोबत आले आहेत.

समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?.
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?.
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका.
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?.
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.