AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : मतदार यादीत नाव आहे ना? सूचना आणि हरकती मांडण्याची शेवटची संधी; वाचा, पुणे महापालिकेनं काय म्हटलं?

मतदारांनी प्रारूप मतदार यादीत जाऊन त्यांचे नाव आणि मतदार क्षेत्राची पडताळणी करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करता येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सूचना आणि हरकती ऐकून घेतल्यानंतर आता 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

PMC election 2022 : मतदार यादीत नाव आहे ना? सूचना आणि हरकती मांडण्याची शेवटची संधी; वाचा, पुणे महापालिकेनं काय म्हटलं?
पुणे महापालिका (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 1:42 PM

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मतदारांना 23 जून ते 1 जुलै या कालावधीत त्यांचे निराकरण करण्याची शेवटची संधी असेल. पीएमसीचा निवडणूक विभाग मतदार यादी (Voter list) अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे. सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत. 31 मेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे आधीच नावनोंदणी केलेल्या पात्र मतदारांना त्यांचा मतदार यादीतील समावेश सत्यापित करण्याची संधी मिळेल. त्यात काही अडचणी असल्यास ते त्यांचे आक्षेप आणि सूचना मांडू शकतात, असे पुणे महापालिका निवडणूक विभागाने सांगितले आहे. मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कासंबंधी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. लोकसभा, विधानसभा किंवा नागरी निवडणूक (Pune civic polls) अशा सर्वच ठिकाणी अडचणी येत असतात. मतदानाच्या दिवशी अशा समस्या टाळण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

आवश्यक ते बदल करण्याचा कालावधी

प्रारूप मतदार यादी 23 जून रोजी महापालिकेच्या वेबसाइट, प्रभाग कार्यालये आणि नागरी निवडणूक विभाग कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येईल आणि त्यांना त्यांच्या राहण्याच्या जागेऐवजी इतर प्रभागातील मतदार यादीत कोणतीही दुरूस्ती, नाव बदलल्याचे आढळल्यास ते त्यावर आपला आक्षेप नोंदवू शकतात, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. शिवाय, पीएमसीने तयार केलेल्या मतदार यादीतून नाव गहाळ आहे, परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत ते अस्तित्वात असल्याचे मतदारांच्या लक्षात आले तर त्यांनी आक्षेप नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

9 जुलै रोजी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी

मतदारांनी प्रारूप मतदार यादीत जाऊन त्यांचे नाव आणि मतदार क्षेत्राची पडताळणी करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करता येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सूचना आणि हरकती ऐकून घेतल्यानंतर आता 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर त्यात बदल केला जाणार नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, या वर्षी 1 जानेवारी रोजी 18 वर्षे पूर्ण केलेले नागरिक निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यास पात्र आहेत. केवळ तेच नवीन मतदार नागरी निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील ज्यांनी 31 मेपर्यंत आपले नाव ECIच्या मतदार यादीत नोंदवले आहे.

हे सुद्धा वाचा

जनगणनेनुसार मतदार आणि उमेदवार

2011च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या 35,56,824 आहे. ज्यात 4,80,017 अनुसूचित जाती आणि 41,561 अनुसूचित जमाती आहेत. पीएमसीमध्ये 57 तीन सदस्यीय निवडणूक पॅनेल आणि एक दोन सदस्यीय निवडणूक पॅनेलमधून 173 नगरसेवक निवडून येणार आहेत. एससी कोट्यातून 23 आणि एसटी कोट्यातून दोन नगरसेवक असतील. राज्यातील नागरी संस्थांमध्ये महिलांसाठी असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार 173 नगरसेवकांपैकी 87 महिला असतील.

भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.