Video : कधीकाळी तमाशा रसिकांना आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ

Shantabai Kopargaonkar : कलाकारांचे जीवन कसे असते, हे नटसम्राट नाटकातून पुढे आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील एका कलाकाराचे असेच जीवन समोर आले आहे. पन्नास-साठ लोकांचे पोट भरणाऱ्या लावणी सम्राज्ञी आता रस्त्यावर भीक मागतेय.

Video : कधीकाळी तमाशा रसिकांना आपल्या अदाकारीने घायाळ करणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ
Shantabai Kopargaonkar Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 11:23 AM

मनोज गाडेकर, कोपरगाव, अहमदनगर : कोणी घर देता का घर… हा नटसम्राट चित्रपटातील डॉयलॉग प्रचंड गाजला. हा डॉयलॉग मराठी रसिक अजूनही विसरले नाही. परंतु कलाकारांचे जीवन कसे असते, हे दाखवणार नटसम्राट. या नाटकाप्रमाणे कधी काळी यशोशिखरावर असलेल्या शांताबाई कोपरगावकर यांच्यांवरही वेळ आली आहे. त्यांनाही घर देता का घर… असे म्हणण्याची वेळ आलीय. गौतमी पाटील हिला ओळखणारी आजची पिढी कदाचित शांताबाई कोपरगावकर यांना ओळखणार नाही.

कोण आहे शांताबाई कोपरगावकर

या रावजी बसा भावजी… ओळख जुनी धरून मनी, काय करू सांगा मी मरजी.. ही लावणी सर्व मराठी रसिकांना आजही माहीत आहे. या आहेत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर. एकेकाळी याच शांताबाईच्या लावणी नृत्याने महाराष्ट्र गाजवला. मुंबईतील परळचं हनुमान थिएटर त्यांनी गाजवलं. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तारभाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला. या तमाशाच्या त्या मालक झाल्या आणि जवळपास पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या.

हे सुद्धा वाचा

यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला, त्यांना बक्कळ पैसा मिळू लागला. मगअशिक्षित असलेल्या शांताबाई यांची फसवणूक झाली. त्यांचा कधीकाळीचा साथीदार अत्तार भाई यांनी फसवणूक केली. त्याने सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्धवस्त झाल्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं, त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या. लग्न झाले नव्हते, ना कुणी जवळचं नातेवाईक….कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालंय..

व्हिडिओ सोशल मीडियावर

शांताबाईचे वय आज ७५ वर्षे आहे.. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही “ओळख जुनी धरून मनी” ही लावणी गात बसलेली असते.. शांताबाईची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कुणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.. खान्देश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडिओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. त्यानंतर खरात यांनी त्यांचा शोध घेतला. त्यांना त्या कोपरगाव बसस्थानकात मिळाल्या. अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावीत्रे यांनी त्यांना रुग्णालयात नेले.

मदत तुटपुंजी

शांताबाईला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यांच्यांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आलीये. राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. अशोक गावीत्रे यांनी सांगितलंय..

आज शांताबाई सारखे अनेक लोककलावंत आहेत जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हलाखीचे जीवन जगतायत. बेघर असणाऱ्या कलाकारांना उतारवयात राज्य शासनाकडून घर मिळावे , आर्थिक पाठबळ मिळावे एवढीच एक माफक अपेक्षा हे कलावंत करतायत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.