Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune leopard Video | दहशत माजवणारा बिबट्या शिकारीसाठी दबक्या पावलाने आला अन्…

pune leopard | पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणे आहे. हे बिबटे अधूनमधून गावात येतात. पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ले करतात. पुणे जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडले आहेत. आता मावळमध्ये वेगळाच व्हिडिओ...

pune leopard Video | दहशत माजवणारा बिबट्या शिकारीसाठी दबक्या पावलाने आला अन्...
leopard file photo
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 9:57 AM

रणजित जाधव, पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्यात बिबट्यांकडून हल्ले होत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. अनेक गावांमध्ये जंगलातून बिबटे येऊन शिकार करतात. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावतात. पिंजऱ्यात त्याच्यासाठी शिकार ठेवतात. त्यानंतर तो पिंजऱ्यात अडकतो. त्याला सोडल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी बिबट्या आल्याचा बातम्या येतात. आता मावळ तालुक्यात बिबट्याचा वेगळचा प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. नेहमी दहशत माजवणारा बिबट्या शिकारीसाठी दबक्या पावलाने आला होता.

सीसीटीव्हीत कैद झाली बिबटयाची चाल

बिबट्याची दहशत ही सर्वश्रुत आहेच. पण शिकार करताना बिबट्याची चाल ही त्याच्या स्वभावाविपरीत असते. तो दबक्या पावलांनी दाखल झाला होता. पुण्याच्या मावळमध्ये शिकारीसाठी आलेल्या बिबट्याची हिच चाल सीसीटीव्हीत कैद झाली. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. हे या दृश्यांनी पुन्हा दिसून आले. परंतु स्थानिक नागरिक बिबट्यामुळे दहशतीत आले आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे घडला हा प्रकार

शनिवारच्या मध्यरात्री मावळ तालुक्यातील सांगवडे येथील विनायक जगताप यांच्या अंगणात हा व्हिडिओ आहे. त्यांचा पाळीव कुत्रा घराबाहेरच रक्षणासाठी बसला होता. त्यावेळी दबक्या पावलात बिबट्या आला. त्याने काही कळायच्या आतच कुत्र्याची शिकार केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

बिबट्याचा मुक्काम फळणे या गावात

मावळातील माऊ या ठिकाणी दिवसा दर्शन देणारा बिबट्याने या गावापासून दोन मैल असलेल्या फळणे गावात मुक्काम ठोकला आहे. अनेक ग्रामस्थांनी या बिबट्याला भैरवनाथ मंदिराच्या पुढे पाहिले आहे. या प्रकारामुळे फळणे ग्रामस्थ भीतीखाली आले आहे. ग्रामस्थांकडून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली गेली आहे.

वनविभागाकडून सावधानतेचा इशारा

याबाबत मावळ वनविभागाने ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गावात रात्री बाहेर फिरु नये, असा सावधगिरीचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनीही शेतीला पाणी सोडण्यास एकट्याने जाऊ नये आणि लहान मुलांना रात्री खेळू देऊ नये, असे म्हटले आहे. नगाठली, माऊ फळणे या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे.

प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.