अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; राष्ट्रीय महामार्गावरील ही दुसरी घटना…

सध्या या प्रकारे अपघात होऊन वन्य प्राणी दगावत असल्याने नागरिकांना प्राणीप्रेमी आणि पर्यावरप्रेमी संघटनेकडूनही  वारंवार आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे अपघात वाढत असल्याने वन विभागाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; राष्ट्रीय महामार्गावरील ही दुसरी घटना...
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 12:25 AM

इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एक बिबट्याचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पळसदेव काळेवाडी नंबर दोन नजीकजवळ ही दुर्घटना घडली आहे. दीड महिन्यापूर्वी ही महामार्गावरच यवतजवळही वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा बिबट्या ठार झाल्याने वन विभागाने वाहनधारकांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव-काळेवाडी नंबर दोन येथे बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री उशीरा घडली आहे. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली.

बिबट्याला धडक बसल्यानंतर काही काळ तो जखमी अवस्थेत पडून आल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

त्यानंतर फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्य व वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बिबट्या गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

महामार्गावर ही दुसरी घटना घडल्याने आता वन विभाग सतर्क झाला आहे.त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करताना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याने प्राणी प्रेमी आणि पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नागरिकांना वाहन सावकाश चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या या प्रकारे अपघात होऊन वन्य प्राणी दगावत असल्याने नागरिकांना प्राणीप्रेमी आणि पर्यावरप्रेमी संघटनेकडूनही  वारंवार आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे अपघात वाढत असल्याने वन विभागाकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.